वाशीम,
Washim News : राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी शासनामार्फत पूरग्रस्त महाराष्ट्र एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सामाजिक व मानवतावादी उपक्रमाला वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.या उपक्रमांतर्गत १४ ऑटोबर २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशीम तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीकरिता एक लाख रुपये इतया रकमेचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी समितीचे सभापती महादेव काकडे, संचालक राजू चौधरी, प्रभारी सचिव वामनराव सोळंके, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या अधीक्षक डॉ. नयना दारक आणि शितल इंगोले उपस्थित होते. यावेळी समाजातील आपत्तीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे हे प्रत्येक संस्थेचे सामाजिक कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शासनाच्या मदत उपक्रमात सर्व संस्था, संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.