सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ

    दिनांक :16-Oct-2025
Total Views |
रिसोड, 
Food Adulteration : तालुक्यासह जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, किराणा माल, तेल, तूप, दूध, पनीरसह दुग्धजन्य पदार्थांमध्ये सर्वाधिक व खुलेआम भेसळ होत असल्याचे सर्वश्रुत आहे. भारतीय खाद्यसुरक्षा आणि मानके प्राधिकरण, जिल्हास्तरावरील सहा. आयुक्त अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात दोनच अधिकारी कार्यरत आहेत सहा. सहायुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे अमरावती जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.
 
 
 
jlk
 
 
 
गणपती उत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळी या सणासुदीच्या काळात विविध प्रकारच्या मिठाई, खाद्यतेल, रवा, तूप, दूध, खवा, पनीर व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. तालुयासह जिल्ह्यामध्ये दुधाळ जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली आहे. याबरोबरच तूप, खवा, पनीर, पेढा हे दुग्धजन्य पदार्थ पया तयार स्वरूपात स्वीट मार्ट दूध डेरीवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. स्वीट मार्ट मध्ये हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहक मोहीत होतील, अशा पद्धतीने सजवून ठेवले जातात. यावर्षी दिवाळी या सणाच्या आनंदोत्सवाच्या पर्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ बरोबरच मिठाईच्या मागणी दुपटीने वाढ होणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून विक्री केल्या जात आह. हे पदार्थ कोणत्या दर्जाचे आहेत याबाबत तपासणी केल्या जात नाही. त्यामुळे भेसळखोरांचे धाडस वाढले आहे.
 
 
सणासुदीच्या हंगामाबरोबरच हॉटेल, रेस्टॉरंट, वाढदिवस पार्टी, लग्न समारंभात पनीर चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढे पनीर येथे कोठून त्याची शुद्धता किती हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. भेसळीच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या तरी ठोस कारवाई केल्या जात नाही. कारवाई केल्याचा देखावा निर्माण करणार्‍या अधिकारी म्हणजे शासकीय यंत्रणेतील एक प्रकारची भेसळच होय.
 
 
माझ्याकडे अमरावती जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे भरली आहेत. परंतु हे अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत. जानेवारीमध्ये रुजू होतील. खाद्यपदार्थाच्या नियमित तपासण्या केल्या जात असून, सदर नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येत आहेत.
भाऊराव चव्हाण, सहा. आयुक्त अन्न व औषधी प्रशासन
 
 
किराणा माल, तसेच मिठाईची दुकानावरुन वरून खरेदी केलेली मिठाई याबाबत तोंडी तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. पुराव्यानिशी ठोस तक्रार प्राप्त झाल्यास अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५९ ६३ अंतर्गत कारवाई केल्या जाईल.
प्रभाकर पाटील, अध्यक्ष,ग्राहक पंचायत रिसोड