मंगरुळनाथ,
Gajanan Parsodkar : परमपुज्य डॉ.हेडगेवार यांनी लावलेला हा संघाचा लहानसा वटवृक्ष विशाल स्वरुपाचा झाला असून, आज मितीला हजारो रा. स्व. संघाच्या शाखा भारत देशासह परदेशात ही पोहचल्या आहे. सर्व स्वयंसेवक कामे देखील करीत आहेत. हे संघशताब्दीचे वर्ष असून, संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगभर यानिमित्त विविध उपक्रम राबविणे सुरू आहे. सेवा कार्य व हिंदुत्व संरक्षणासाठी तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रमुख प्रवक्ते गजानन परसोडकर यवतमाळ यांनी केले.

कार्यक्रमाध्यक्ष म्हणून माजी सैनिक देविदास बुरकले गुरुजी, तालुका कार्यवाह संजीव टोंचर, शेलुबाजार उपखंड कार्यवाह गोपाल पाटील राऊत उपस्थित होते. तालुयातील शेलुबाजार येथील साई मंदीर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेलुबाजार उपखंडाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी, शस्त्रपुजन उत्सव व पथसंचलन कार्यक्रम १२ आटोंबर रोजी संपन्न झाला. शेलुबाजार नगरात भव्य पथसंचलन काढण्यात आले. सदर पथसंचलन साईमंदीर ते अकोला चौफूली मालेगाव रस्त्याने पुढे शिव चौक,गुप्ता चौक, मार्गे श्रीराम मंदीर, मार्केट रस्त्याने परत साई श्रद्धा मंदिर येथे आले. पतसंंचालनाच्या रस्त्यात महिलांनी आपापल्या घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. नागरिकांनी पतसंचालनावर फुलांचा वर्षाव केला. अतिथींचा परिचय उपखंड कार्यवाह गोपाल पाटील राऊत यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन उपखंड सहकार्यवाह प्रशांत सपकाळ यांनी केले.