गांजाची तस्करी करणार्‍या कमलवर कारवाई

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
smuggled-ganja स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने कारंजा येथील दुर्गानगरात छापा टाकूण गांजा, रोख, दुचाकी, मोबाईल असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.
 
 
smuggled-ganja
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारंजा ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यांना कमल सोनी नावाची महिला गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करीत आहे. तिच्या घरी छापा टाकला असता क्रिष्णा कंजर रा. इतवारा बाजार वर्धा हा मिळून आला. झडती दरम्यान त्यांचे ताब्यातून गांजा खरेदीसाठी आणलेली रकम मिळून आली. smuggled-ganja गांजा कमल सोनीचा जावई सुजीत सोनी रा. कारंजा याने आणून दिला. तर क्रिष्णा कंजर हा तिच्याकडे कामाला होता. त्यांच्या ताब्यातून ३ किलो १४५ ग्रॅम गांजा, दुचाकी, रोख ५१ हजार, दोन मोबाईल असा ३ लाख ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, निलीमा उमक, रवी पुरोहित, अभिषेक नाईक आदींनी केली आहे.