हिंगणघाटात शप गटाची काळी दिवाळी

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट, 
wardha-news अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारचे पॅकेज फसवे असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निषेधात्मक काळी दिवाळी करून सरकारचा निषेध करण्यात आला.
 

wardha-news 
 
सरकारने सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ७५ हजार रुपये प्रोत्साहनपर मदत, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना हेटरी ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेटरहून अधिक शेतीचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ऊस, कांदा आदी पिकांचे उत्पादन पूर्णतः कोसळले आहे. अनेक शेतकर्‍यांच्या गायी-म्हशी, बैल, शेळ्या व कोंबड्यांचा मृत्यू झाला. परंतु, सरकारने
जाहीर केलेले पॅकेज शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले, अशी टीका अतुल वांदिले यांनी केली. सरकारकडून सोयाबीनसाठी प्रती हेटर ५० ते ६० हजार रुपये खर्च येत असताना सरकार फत ८५०० रुपयांची मदत देत आहे. सरकारने पीक विमा योजना आणि त्यातील ट्रीगर बदल करून शेतकर्‍यांना फसवले. wardha-news अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या जनावरांसाठी सरकारकडून मिळणारी मदतही अपुरी असल्याचे वांदिले म्हणाले. गाळाने भरलेल्या विहिरींसाठी प्रती विहीर १ लाख रुपये मदत देण्याची मागणीही करण्यात आली. मजूर कुटुंबांनाही अतिवृष्टीचा फटका बसला असून त्यांना २५ हजार रुपये रोख मदत यासह अन्य मागणी करण्यात आली. निषेध आंदोलनात जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, बालू वानखेडे, सुनील डोंगरे, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, शेखर जाधव, मिलिंद कोपुलवार, ओमकार मानकर, मिना सोनटके, सुजाता जांभुळकर, दीपाली रंगारी, सुनील भुते, आदी सहभागी झाले होते.