नागपूर,
Diwali-Jungle Safari : पावसामुळे गेल्या ३ महिन्यांपासून पर्यटकांना जंगल सफारी करता आली नव्हती. मात्र आता जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येत आहे. वन विभागाने पर्यटकांसाठी तिकीट बुकिंग सुरू केल्यानंतर आता डिसेंबरपर्यंतचे बुकींग पूर्ण झाले गत वर्षी ३ लाख ८० हजार पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद लुटला होता. यंदा हा आकडा पार होईल, असा विश्वास अंधारी- ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी व्यक्त केला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रदर्शन
मुख्यत: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक पर्यटकांची गर्दी असते. जंगल सफारीची ऑफलाइन बुकींग यापूर्वीच पर्यटकांना आता बफर झोनमध्ये प्रवेश करता येईल.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहजरित्या व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. दिवाळीदरम्यानच्या सुटीतील सर्व तारखा बुकींग झाल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-करांडला, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आणि बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. नागपूर विभागातील सर्व १ ऑक्टोबरपासून जंगल सफारी सुरू करण्यात आली असून गत पंधरा दिवसात अनेक पर्यटकांनी जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला आहे.
ऑक्टोबर महिन्यातील हवामान अनुकूल
वन विभागाच्या माहितीनुसार गत तीन महिने जंगल सफारी बंद राहिल्यानंतर, आता इतर व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी जंगल सफारीकरिता बुकींग होत आहे. रामटेक तालुक्यातील सिल्लारी गेटकडून सफारीला गेलेल्या गेल्या वर्षी टी-६२ वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे मनमोहक दर्शन झाले होते. त्यामुळे यंदा पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेट, खुर्सापार गेट, बनेरा गेट व चोरबाहुली गेटवरून सफारीसाठी सुध्दा पर्यटक इच्छूक दिसून येतात.
पर्यटनासाठी ऑक्टोबर महिन्यातील हवामान अनुकूल असल्याने दिवाळीपूर्वीच जंगल सफारी करीता अनेकांनी बुकींग केल्या आहेत. त्यामुळे पुढील १५ पर्यटकांची वर्दळ राहणार आहे.
विदेशी पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी
विदर्भात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पौनी-करांडला अभयारण्य आणि टिपेश्वर अभयारण्य यासह अनेक वनक्षेत्रे आहेत. दरवर्षी, प्रामुख्याने दिवाळीनंतर पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ सुरू होत असते. उन्हाळ्यातील जून पर्यंत या भागात पर्यटकांची गर्दी असते. वनक्षेत्राचा अनुभव आणि त्यात वन्यजीवांचे हे सर्वांसाठी उत्साहाचे कारण आहे. देशातीलच नव्हे तर विदेशातील अनेक पर्यटक आता विदर्भातील व्याघ्र दर्शनासाठी येत आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ
विशेषत: जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक ऑनलाइन बुकिंग करून येथे येतात. पावसाळी दिवसात जंगल सफारी बंद राहात असल्याने अनेकजण ऑक्टोबर महिन्याची प्रतिक्षा करीत असतात. गत काही वर्षांच्या तुलणेत पर्यटकांची संख्या वाढत असल्याने वन विभागाला अधिक चांगल्या सुविधा द्याव्या लागणार आहे. जंगल सफारीसाठी बांधलेले रस्ते कच्चे असल्याने, पावसाळ्यानंतर जीप आणि इतर वाहने अडकतात, जी पर्यटकांसाठी त्रासदायक आणि असुरक्षित आहे. या गोष्टी लक्षात घेऊन वन विभागाच्या वतीने जंगल सफारी उशिरा सुरु केल्या जाते. मात्र आता, जंगल सफारी सुरू झाल्याने दिलासा व्यक्त केला आहे.