योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्यांक युवकांच्या प्रगतीस गती द्या: जिल्हाधिकारी

अल्पसंख्यांक युवकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
वाशीम, 
washim-news : अल्पसंख्यांक युवकांच्या प्रगतीसाठी शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा खर्‍या अर्थाने फायदा युवकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि रोजगार या क्षेत्रात ठोस परिणाम साधावेत. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
GJH
 
 
 
अल्पसंख्यांक युवकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीत नियोजन अधिकारी संजय राठोड, नगर प्रशासन अधिकारी बी. डी. बिकड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय ससाणे तसेच उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्यासह समितीशी संबंधित विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
 
 
अल्पसंख्यांक युवकांना शिक्षण, रोजगार व सामाजिक क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी शासनाचे विविध विभाग एकत्रितपणे काम करत आहेत. या प्रयत्नांना गती देण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण, नगरविकास, कौशल्य विकास, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक न्याय या विभागांकडून अल्पसंख्यांक विभागाने राबवावयाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती आणि पुढील कार्यवाहीबाबत चर्चा झाली.
 
 
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी विविध विभागादरम्यान समन्वय साधून अल्पसंख्यांक युवकांना योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी युवकांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यक्षम व परिणामकारक अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले. युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण कार्यक्रमांची वाढ, तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.