पाकिस्तान लष्कराला फोटाे पाठविण्याच्या आराेपात ‘डिजीटल अरेस्ट‘

- सायबर गुन्हेगाराने उकळले 17 लाख

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
pakistan-army-digital-arrest : पाकिस्तानला भारतीय लष्कराचे फोटो पाठविणे तसेच पहलगाम हल्ल्यातील आराेपींच्या चाैकशीत नाव आल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त व्यक्तीला जाळ्यात ओढले. ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून आराेपींनी त्यांच्याकडून 17 लाख रुपये उकळले. वाठाेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
 
 
 
doigital arrest
 
 
 
संबंधित तक्रारदार एका बॅंकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. 19 सप्टेंबर राेजी त्यांना 9514865180 या क्रमांकावरून फोन आला व समाेरील व्यक्तीने मुंबई पाेलिस मुख्यालयातून बाेलत असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये नेव्ही व आर्मी बेस कॅम्पचे फोटाे पाकिस्तानला पाठविण्याच्या प्रकरणात तुम्ही संशयित आराेपी आहात. तसेच पहलगाम हल्ल्यातील आराेपींच्या चाैकशीतून तुमचे नाव आले आहे. तुम्हाला 70 लाखांचे कमिशन मिळाल्याची माहिती मिळाली असल्याचे समाेरील तथाकथित महिला कर्मचाèयाने सांगितले. तिने पुणे एटीएसशी फोन जाेडून देते, असे सांगितले व पाेलिसांच्या वर्दीतील एका व्यक्तीने सेवानिवृत्ताची झाडाझडती घेतली. त्यानंतर 22 सप्टेंबरपर्यंत आराेपींनी त्यांना दर अर्ध्या तासाने माेबाईलवर मॅसेज पाठविण्यास सांगितले. तसेच दर दाेन तासांनी व्हिडीओ काॅल करण्यास सांगितले. 23 सप्टेंबर राेजी त्यांना तथाकथित सदानंद देठे नावाच्या व्यक्तीचा फोन आला व ताे पाेलिसांचा प्रमुख असल्याचे सांगितले.
 
 
अन् निघाला अटक वाॅरंट
 
तुमच्याविराेधात अटक वाॅरंट निघाला असून आता अटक करावी लागेल, असे सायबर गुन्हेगाराने सांगितले. त्यामुळे सेवानिवृत्त अधिकारी आणखी घाबरले. त्यांनी समाेरील व्यक्तीला त्यांचे पीपीएफ खाते व मालमत्तेचे इतर तपशील दिले. समाेरील व्यक्तीने आरबीआयकडून सर्व पैसे गाेठविल्या जातील, असे सांगत पीपीएफची रक्कम काढायला लावली. बॅंकेत गेल्यावर फोनचा व्हिडीओ काॅल सतत सुरू ठेवण्यास सांगण्यात आले. सेवानिवृत्त अधिकाèयाने तसेच केले व 24 सप्टेंबर राेजी त्यातील 19.50 लाखांची रक्कम आराेपीने सांगितलेल्या बॅंक खात्यावर वळती केली.
 
 
मित्राच्या मदतीने प्रकार उघडकीस
 
पैसे जमा करताच समाेरील व्यक्तीने आरबीआयचे पैसे जमा झाल्याचे पत्रदेखील पाठविले. दुसèया दिवशी आराेपींनी त्यांना आणखी रक्कम आरटीजीएस करण्यास सांगितली. व्हिडीओ काॅल सुरूच ठेवून अधिकारी बॅंकेत गेले असता तेथे जुना मित्र भेटला. त्याच्या ाेनवरून त्यांनी एका वकिलाला संपर्क साधून वाॅरंट व आरबीआयचे पत्र पाठविले असता हे सर्व बनावट असल्याचे त्यांना वकिलाने सांगितले. त्यानंतर अधिकाèयाने वाठाेडा पाेलीस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे.