नागपूर,
Nisargaraja Foundation निसर्गराजा फाउंडेशनतर्फे मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगजवळील खुल्या मैदानात रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भक्तीगीते, सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी सादर केली जाणार आहेत.
नोंदणीकृत निसर्गराजा फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण आणि इतरकार्यांमध्ये सक्रिय आहे. या संगीतमय कार्यक्रमात नागपूरचे सुप्रसिद्ध गायक शांताराम बहादुरे, शिवाजी ढोमणे, सुभाष नागदेवे आणि डॉ. सोहन चवरे हे आपली कला सादर करणार आहेत. Nisargaraja Foundation कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष वामनराव नंदागवळी, प्रमुख अतिथी म्हणून सचिव अभिजीत रामटेके आणि कोषाध्यक्ष युवराज फुलझले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. सोहन चवरे करतील. संगीत रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रसिद्ध गाण्यांचा आस्वाद घेऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.
सौजन्य: डॉ. सोहन चवरे, संपर्क मित्र