आठ वर्षे संसार केल्यानंतर पहिला पती जिवंत असल्याच्या दाव्याला अर्थ नाही

- दुसऱ्या पतीकडून पाेटगी मंजूर: उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्णय

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur News : पहिल्या पतीची चारित्र्यावरील संशय घेण्याची वृत्ती आणि मारहाणीला कंटाळून महिला पतीचे घर साेडून माहेरी आली. काही वर्षांनंतर महिलेची एका युवकासाेबत मैत्री झाली. दाेघांनी लग्न करुन ग्रामपंचायत कार्यालयात लग्नाची नाेंद केली. मात्र, आठ वर्षांनंतर तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळीने माहेरुन पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे तिने पाेटगीसाठी न्यायालयात दावा केला. न्यायालयाने तिला पाेटगी मंजूर केली. ‘जरी त्या महिलेचा पहिला पती जिवंत असला तरी त्या महिलेने दुसरे लग्न करुन पती-पत्नी या नात्याने संसार केला.फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 125 अंतर्गत पीडित पत्नीला पहिले लग्न कायम असतानाही दुसऱ्या पतीकडून पाेटगी मागता येते,’ निरीक्षण नाेंदवून उच्च न्यायालयाने महिलेला पाेटगी मंजूर केली.
 

ngp 
 
 
 
अकाेला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील एका खेडेगावात राहणारी महिला अंजली (बदललेले नाव) हिचे रितीरिवाजानुसार आणि कुटुंबियांच्या सहमतीने संजय या शेतकरी युवकाशी लग्न झाले. मात्र, लग्न झाल्यावर काहीच महिन्यांत काैटुंबिक वाद सुरु झाले. पतीला दारुचे व्यसन हाेते तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हाेता. शेजारी राहणाèया युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा आराेप करुन तिला मारहाण करीत हाेता. राेजच्या मारहाणीला कंटाळून अंजली माहेरी परत आली. त्यानंतर ती परत नांदायला गेली नाही किंवा संजयनेही तिला सासरी परत नेले नाही. त्यामुळे दाेघांचे संबंध संपले हाेते. माहेरी राहत असताना तिची ओळख महेश (बदललेले नाव) याच्याशी झाली. त्याच्या पत्नीचे निधन झाले हाेते. त्यालाही दुसरे लग्न करायचे हाेते. त्यामुळे त्याने अंजलीशी मैत्री केली. काही दिवसांत दाेघांचेही सूत जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 
 
ग्रामपंचायत कार्यालयात लग्नाची नाेंद
 
 
अंजलीने आईवडिलांशी चर्चा करुन महेशला लग्नासाठी हाेकार कळविला. तर महेशनही कुटुंबियांसाेबत अंजलीची ओळख करुन दिली. त्यावेळी अंजलीने पतीशी संबंध संपल्याची माहिती हाेणारा पती महेशला दिली हाेती. त्यानंतर दाेघांनी जून 2008 मध्ये लग्न केले आणि पती-पत्नी म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात नाेंद केली. दाेघांचाही सुखी संसार सुरु हाेता.
 
 
संसार विस्कटला आणि न्यायालयात धाव
 
 
2008 ते 2016 यादरम्यान अंजली आणि महेश यांचा संसार सुरळीत सुरु हाेता. मात्र, अचानक महेश आणि त्याच्या आईवडिलांनी अंजलीला माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे ती माहेरी गेली. तिने मूर्तीजापूर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात पाेटगीसाठी अर्ज केला. तिला न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 125 अंतर्गत 4 हजार रुपये मासिक पाेटगी मंजूर केली.
 
 
न्यायालयाच्या आदेशाला आव्हान
 
 
महेशला पत्नीला पाेटगी द्यायची नसल्यामुळे त्याने सत्र न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यामुळे राजीवने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. ‘आम्ही लग्न केले त्यावेळी अंजलीचा पहिला पती जिवंत हाेता. परंतु, तिने पहिल्या पतीचे निधन झाल्याचे सांगून बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर माझ्याशी लग्न केले. पहिल्या पतीला घटस्फोट न देता किंवा पहिला पती जिवंत असताना मृत्यूचा बनावट दाखल सादर केल्यामुळे पाेटगी मंजूर करण्यात येऊ नये,’ असा दावा महेशने केला. उच्च न्यायालयाने हा दावा गुणवत्ताहीन ठरवून वरीलप्रमाणे निर्णय दिला आणि राजीवची याचिका फेटाळून लावली.
 
 
न्यायालयाचे निरीक्षण
 
 
अंजली पहिल्या पतीला साेडून माहेरी आल्याची बाब महेशला माहिती हाेती तसेच तिने पती जिवंत असल्याचेही सांगितले हाेते. दाेघांनीही ग्रामपंचायत कार्यालयात लग्नाची नाेंदणी केली आणि आठ वर्षे संसार केला. लग्नानंतर महेश व सासरच्या मंडळीने अंजलीचा माहेरुन पैसे आणण्यासाठी शारीरिक मानसिक छळ केला. तिला मारहाण करुन घराबाहेर काढले. त्यामुळे ती माहेरी गेली. अंजलीकडे उत्पन्नाचा स्राेत नाही. तिच्या वृद्ध आईवडिलांच्या भराेश्यावर ती जगत आहे. तिने पाेटगीसाटी अर्ज केला आणि न्यायालयाने ताे मंजूर केला. पहिला पती जरी जिवंत असला तरीही अंजली पाेटगी मिळण्यास पात्र आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नाेंदवूनाैजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 125 अंतर्गत 4 हजार रुपये मासिक पाेटगी मंजूर केली.