ऋतिका देशपांडे राष्ट्रीय टेनिस चॅम्पियन

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
नागपूर,
National Tennis Champion सिन्सिअर टेनिस अकॅडमीतील ११ वर्षीय खेळाडू ऋतिका देशपांडेने ऑल इंडिया नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप सिरीज- अंडर १४ स्पर्धेत रायपूर, छत्तीसगड येथे विजेतेपद पटकावले. ऋतिकाने अत्यंत , चिकाटी आणि जिद्द दाखवत संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. प्री-क्वार्टरफायनलमध्ये तन्वी बेहरा, क्वार्टर फायनलमध्ये दुसऱ्या मानांकित वन्या पुंडीर, सेमिफायनल मध्ये लस्या प्रिया पप्पला यांना पराभूत करत ती फायनलमध्ये राष्ट्रीय क्रमांक २४ असलेल्या फागुन ज्योतीला ३-६, ६-४, ६-३ असा थरारक सामना जिंकून विजेतेपद मिळवले.
 
National Tennis Champion
 
ऋतिकाच्या कामगिरीबद्दल जी.एम.सी. डीन डॉ. गजबिये, फिजिकल एज्युकेशन National Tennis Champion टीचर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ. चारमोदे, मुख्य प्रशिक्षक सचिन पाटील आणि अकॅडमीतील प्रशिक्षक वैभव कुंभरे, चेतन उके यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: वैभव कुंभारे, संपर्क मित्र