स्मार्ट शाळा प्रकल्प, 23 शिक्षकांचा सन्मान

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
गडचिरोली, 
smart-school-project राज्य शासन आणि संपर्कफाउंडेशन यांच्यावतीने जिल्ह्यात संपर्क स्मार्ट शाळा हा कार्यक्रम 2023 पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक तसेच शाळांना गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात पार पडला.
 
 
smart-school-project
 
संपर्क स्मार्ट शाळा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून उत्कृष्ट शाळा व उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. यात जिल्ह्यातील 15 शाळा व 23 शिक्षकांचा सहभाग होता. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाबासाहेब पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे होते. संपर्क फाउंडेशनने जिल्ह्यात 1493 शाळांना यापूर्वी गणित टीएलएम किटचे वाटप केले आहे. सध्या 605 शाळांमध्ये संपर्क टीव्ही डिव्हाइस देण्यात आलेला आहे. हा डिव्हाइस इंटरनेटशिवाय काम करतो व शिक्षकांना अध्यापनात मदत करतो. सोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा आनंददायी वातावरणात शिकणे या संपर्क डिव्हाइसमुळे सोपे व सुलभ झाले. smart-school-project कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी लता चौधरी, संपर्क फाउंडेशनचे राष्ट्रीय व्यवस्थापक राजन अधिकारी, राज्य व्यवस्थापक मुकेश रावत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल चिकटे यांनी केले. संचालन जिल्हा कार्यक्रम समन्वयक कमलाकर मांडवे तर आभार सूरज रापार्तीवार यांनी मानले.