ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राज्य स्तरीय समितीत अशोक राणे यांची निवड

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
अकोला,
Ashok Rane : बाळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अध्यासन समितीचे सदस्य अशोक राणे यांची महाराष्ट्र सरकारने ग्राम विकास मंत्रालयाच्या राज्य स्तरीय अभ्यास समितीत अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे.
 
 
 
rane
 
 
 
नुकतीच ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेत सामाजिक सुधारणा व राज्यातील स्मशानभूमीच्या विशेषतः ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समितीचे गठन करण्यात आले आहे. या अभ्यास समितीमध्ये लातूर येथील आ. अभिमन्यू पवार, सोलापूरचे आ. देवेंद्र कोठे, पुणे येथील विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांच्यासह अशोक राणे यांची निवड झालेली आहे. तसेच गठीत झालेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीमध्ये शासनाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक वनीकरण आणि व जिल्हा परिषद संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सदस्य म्हणून समावेश असणार आहे. अशोक राणे इतिहासाचे अभ्यासक असून मुक्त पत्रकार म्हणून लेखन करतात.यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत.