धरमपेठ महाविद्यालयात शिक्षक–पालक सभा

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
नागपूर ,
Teacher-Parent meeting आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २०२५–२६ साठी शिक्षक–पालक सभा घेण्यात आली. उपप्राचार्य प्रा. डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक–पालक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय राठोड तर सहसमन्वयक प्रा. सिंधू कृष्णन, प्रा. गायत्री जोशी व प्रा. अभय दिवे होते.
 
palak
 
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिघांचाही शैक्षणिक प्रक्रियेतला परस्परसंबंध महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Teacher-Parent meeting यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुनिता ठवरे, प्रा. जयंता डहाके, सहसमन्वयक प्रा. सिंधू कृष्णन, प्रा. गायत्री जोशी आणि प्रा. अभय दिवे उपस्थित होते.सभेमध्ये शिक्षक–विद्यार्थी–पालक समितीचे गठन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
 
सौजन्य :डॉ. सुनिता ठवरे,संपर्क मित्र