रोहणा येथे रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
रोहणा, 
rashtriya-swayamsevak-sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रोहणा शाखेचा विजयादशमी उत्सव सेवा सहकारी सोसायटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अरविंद कुर्‍हाडे होते तर प्रमुख वते म्हणून अमरावती विभाग रा. स्व. संघ सामाजिक सद्भाव संयोजक विलास भास्करवार होते तर मंडळ कार्यवाह शरद जळीत यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
 

rashtriya-swayamsevak-sangh 
 
विलास भास्करवार यांनी १०० वर्षापूर्वी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी काही मित्रांच्या मदतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रारंभ केला. संघ स्वयंसेवकांनी त्यावेळी केलेल्या त्याग, समर्पण आणि तपस्या यामुळे आज संघ जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे. मात्र, भारत भूमीत अद्याप पावेतो पूर्णपणे वृध्दिंगत होण्यासाठी या शताब्दी वर्षात आपणा सर्व स्वयंसेवकास, संघप्रेमी व संघासोबत जुळलेल्या व्यतीनी सहकार्य करणे आवश्यक आहे. rashtriya-swayamsevak-sangh अन्यथा, जिथे आपण कमी पडतो तिथे आपणास कोण ना कोणत्या तरी वाईट प्रवृत्ती सोबत झगडावे लागत आहे. हे सर्व होऊ नये म्हणून आपणास संघासोबत जुळणे गरजेचे ठरते, असे भास्करवार म्हणाले. संघाला शिव्या घालू नका तर संघासोबत तन, मन आणि शय असेल त्यांनी धनाने सुद्धा जुळा. कारण मी भारतातील संघ आणि बाहेर देशातील संघ सुद्धा जवळून पाहिला आहे. म्हणूनच आपण स्वतः संघाशी जूळतो. आपण सुद्धा धर्माच्या आणि देशाच्या एकत्रित येणे गरजेचे आहे. या विचाराने एकत्रित येण्यामुळेच देश प्रगतीपथावर जाईल असे डॉ. कुर्‍हाडे म्हणाले. कार्यक्रमाची सुरूवात अमृत वचन, सुभाषित, वैयक्तिक गित सांघिक गीताने झाली. प्रास्ताविक व संचालन आर्वी तालुका सामाजिक सद् भाव समन्वयक प्रकाश टाकळे यांनी केले.