मानोरा,
cylinder-leak-fire : शहरातील मंगरूळनाथ महामार्गावर असलेल्या घरातील स्वयंपाक गृहात सकाळी झालेल्या घरगुती वापराच्या सिलेंडर लीक झाल्याने स्वयंपाक खोलीसह घरातील सर्व सामानांची राख रांगोळी झाली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणाचीही जीवित हानी झाली नाही.
रवी पवार यांचे मंगरूळनाथ महामार्गावर निवासस्थान आहे. सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान स्वयंपाक खोलितील गृह उपयोगी सिलेंडर अचानक लिक झाल्याने संपूर्ण घराला आग लागली. स्वयंपाक खोलीतील या सिलेंडर च्या आगीमूळे गृह उपयोगी सर्व भांडे कुंडे व धान्याची राख रांगोळी झाली आहे. स्वयंपाक खोलीतील फ्रिज सह पवार कुटुंब राहत असलेल्या वेगवेगळ्या खोल्यांमधील वातानुकूलित यंत्र, फर्निचर, कपडे, धनधान्य व कागदपत्रे या आगीत खाक झाले. स्वयंपाक घरात आगीचे लोळ दिसल्याने घरामध्ये राहायला असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने घराबाहेर पडल्याने हे कुटुंबीय सुदैवाने थोडयात बचावले. परिसरातील नागरिकांनी जवळच्या मोटर पंपाने आग विझवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली.
नगरपंचायत प्रशासनाची आग विझवणारी गाडी सुद्धा काही वेळाने आगीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी येथे पोहोचल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्याम राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधी दिला दिली.