गोमातेचे दर्शन घेतल्याशिवाय कुठलेही कार्य करत नाही : आ.सई डहाके

    दिनांक :17-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड, 
sai-dahake : माजी आमदार स्व. प्रकाश डहाके हे गोमातेचे दर्शन घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हते. तीच परंपरा मी आणि माझा परिवार आजही जोपासतो. दररोज सकाळी गोमातेचे दर्शन घेतल्याशिवाय मी कुठलेही कार्य करत नाही असे आ.सई डहाके यांनी सांगितले. वसु बारसनिमित्त (गोवत्स द्वादशी) १७ ऑटोबर रोजी स्थानिक पांजरापोळ गोरक्षण संस्था येथे गोमाता पूजन व महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेल्या आ. सई डहाके यांनी उपरोक्त मनोगत व्यक्त केले.
 
 
 
JIKLK
 
 
 
पुढे बोलताना त्यांनी गोमातेच्या असुरक्षितेबद्दल चिंता व्यक्त करत यावर सरकार सकारात्मक काम करत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी तहसीलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने हजर होते. त्यांनी गोमातेच्या सेवेसाठी कार्य करणार्‍या पांजरपोळ संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. त्यापूर्वी, गोमातेचे मान्यवरांनी पूजन केले. त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम पार पडला. संचालन संस्थेचे सचिव आशिष तांबोळकर यांनी केले. त्यांनी सध्या कारंजाच्या गोशाळेत ७५ तर पलाना येथील गोशाळेत ३८० भाकड जनावरे असल्याची माहिती दिली आणि त्यांच्या पालन पोषणासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ज्येष्ठ पत्रकार कृष्णकुमार लाहोटी यांनी पांजरापोळ संस्थेला २१ हजार रूपयांचा धनादेश प्रदान केला. आभार संस्थेचे अध्यक्ष ब्रिजमोहन मालपाणी यांनी मानले.
 
 
कार्यक्रमाला शेखर बंग, भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी संग्राम पाटील, बाजार समितीचे संचालक दिनेश राठोड, माजी नगराध्यक्ष विजय बगडे, परमेश्वर व्यवहारे, डॉ.सुशील देशपांडे, आशिष बंड, गुरुमंदिर संस्थानचे विश्वस्त प्रकाश घुडे, किरीट रायचुरा, हेमंत फुलाडी, आमोद चवरे, परेश ठाकूर, डॉ.नवल हेडा, रुपेश बाहेती, बिपीन वाणी, निरंजन करडे, डॉ.जवाहर राजवानी , भीमराव कोळकर, प्रा. रमेश सांबसकर , अ‍ॅड. पिंजरकर, संदीप काळे व इतर उपस्थित होते.