नागपूर,
Air Force Chief, Guard of Honor, वायु सेना नगर, येथे मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी या अध्यक्षपद भूषवले. त्यांचे स्वागत एअर मार्शल व्हीके गर्ग, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड यांनी केले. एपी सिंग यांच्या आगमनानंतर, हवाई दल प्रमुख यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
स्वदेशी तंत्रज्ञान विकासाद्वारे क्षमता वाढवणे ही थीम स्वावलंबन, स्वदेशीकरण आणि महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधते. या कॉन्क्लेव्हने प्रमुख ऑपरेशनल, देखभाल आणि आदींवर चर्चा करण्यात आली.एकत्रित चर्चेत प्रामुख्याने कार्यक्षमता आणि तांत्रिक नवोपक्रम वाढवणे या उद्देशाने देखभाल कमांडच्या उपक्रमांबद्दल हवाई दल प्रमुखांना माहिती देण्यात आली. त्यांनी भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशन आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कर्मचार्यांचे कौतूक केले. हवाई दल प्रमुखांनी भारतीय हवाई दलाच्या कामकाजात देखभाल कमांडच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी सर्व कर्मचार्यांना व्यावसायिकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या उच्च दर्जासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.