असोलामेंढा नहरात आजोबा-नातू वाहून गेले

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
सावली, 
asolamendha-canal : तालुक्यातील असोलामेंढा मुख्य कालव्यात आजोबा-नातू वाहून गेले. ही घटना शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. आजोबा भगवान लाटेलवार (70, रा. खांबाडा, ता. चिमूर) आणि नातू रोहित राजू गोरंतवार (14, रा. इंदिरा नगर, बोथली अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
 
 
 
chandrpur
 
 
 
भगवान लाटेलवार हे चिमूर तालुक्यातील खांबाडा येथील रहिवासी असून, ते आपली मुलगी कार्तिका राजू गोरंतवार हिला दिवाळी सणानिमित्त भेटण्यासाठी सावली तालुक्यातील इंदिरानगर (बोथली) येथे आले होते. शनिवारी पहाटे नातू रोहित आणि आजोबा हे दोघे गावालगत असलेल्या आसोलामेंढाच्या मुख्य नहरात आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करीत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही वाहून गेले. घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केले. वृत्त लिहेपर्यंत दोघांचाही शोध लागला नव्हता.