इस्रायलमध्ये लाल वासराचा जन्म म्हणेज महाप्रलयाचा संकेत!

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
जेरुसलेम,
birth of the red calf in Israel २००० वर्षांत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये लाल वासराचा जन्म झाला असल्याच्या बातमीनंतर जगभरात चर्चा आणि चिंता सुरू झाली आहे. ख्रिश्चन आणि ज्यू धर्मग्रंथांनुसार, लाल वासराचा जन्म हा जगाच्या अंताचे किंवा महाप्रलयाचे संकेत मानला जातो. त्यामुळे अनेक लोकांमध्ये भय आणि अंधश्रद्धा वाढली आहे. जेरुसलेममधील टेंपल इन्स्टिट्यूटने या वासराच्या जन्माची माहिती युट्यूबवर जाहीर केली असून, सखोल तपास चालू असल्याचे सांगितले आहे. संस्थेने नमूद केले आहे की वासराचा रंग पूर्णपणे लाल आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
 
 

birth of the red calf in Israel 
 
लोकांमध्ये या घटनेमुळे भविष्यात होणाऱ्या संकटांबाबत चिंता निर्माण झाली आहे, तर काहीजण याला अंधश्रद्धा मानत आहेत. इतिहासात अनेकदा जगाच्या अंताबाबत भाकिते केली गेली आहेत, ज्यापैकी बहुतांश चुकीची ठरली आहेत. २०१२ मध्ये मायान कॅलेंडरवरून जगाच्या संपण्याची भीती होती, पण प्रत्यक्षात काहीही घडले नाही. तथापि, लाल वासराच्या जन्मामुळे या धर्मग्रंथांमधील पूर्वकल्पना आणि भविष्यवाण्यांमुळे चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही धर्मतज्ज्ञ म्हणतात की या घटनेनंतर ज्यू मशीहाचा आगमन किंवा महाप्रलयाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असू शकते, पण सध्या तपास आणि तज्ज्ञांचा सखोल अभ्यास सुरू असल्यामुळे कोणतेही अंतिम निष्कर्ष लागलेले नाहीत.