तळेगाव (श्या.पंत),
ashti-news : आष्टी तालुक्यात पिकांच्या ओलीताकरता ऊर्ध्व वर्धा डावा कालवा तसेच आष्टी व मलकापूर तलावाचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी भाजपा नेते अशोक विजयकर यांचेसह भाजपच्या पदाधिकार्यांनी १७ रोजी आ. सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत १७ रोजी तहसील कार्यालय आष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला आ. सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे आले असता अशोक विजयकर, भाजपा जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, तालुका अध्यक्ष सचिन होले, तालुका सरचिटणीस देवानंद डोळस, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध दंडाळे, राजेश ठाकरे, प्रशांत काकपुरे, आदींनी निवेदन दिले. आष्टी तालुयात ६ ऑटोबरपासून मान्सून ने माघार घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली. वातावरणात उकाडा वाढला त्यामुळे पिकाचे ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पीक करपून जाण्याची भीती आहे. पाटबंधारे जलसंपदा विभागामार्फत उर्ध्व वर्धा डावा कालवा तसेच मलकापूर व आष्टी तलावाचे पाणी हे साधारणपणे दरवर्षी १५ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे सोडले जाते. मात्र, पीक परिस्थिती लक्षात घेता जलसंपदा विभागाने कालव्याचे पाणी २० ऑटोबरपासून सोडावे अशी निवेदनातून मागणी