वर्धा,
Datta Mandir प्रकाश, आनंद आणि स्वच्छतेचा उत्सव असलेल्या दिवाळीला यंदा वर्धेत एक वेगळीच सुरुवात मिळाली. शहरातील दत्त मंदिरामध्ये सद्गुरूदास सत्संग मंडळाच्या वतीने स्वच्छतेचा उपक्रम राबवित देवाच्या दारीच स्वच्छतेचा प्रथम दीप असा सुंदर संदेश दिला.
शहरातील दत्त मंदिरात सद्गुरूदास सत्संग मंडळाच्या भक्तांनी एकत्र येत मंदिराची स्वच्छता करून फुलांच्या सजावटीने देवळांना नवे तेज दिले. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेतला. दिवाळी ही केवळ घर सजवण्याचा सण नाही, तर मन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा असल्याचे दत्त मंदिराचे सचिव मदन परसोडकर म्हणाले.
स्वच्छतेनंतर मंदिरात आरती, दीपप्रज्वलन आणि प्रसाद वाटप करून दिवाळीच्या शुभारंभाचा आनंद सर्वांनी वाटून घेतला. या अभियानात मदन भुलगावकर, वैशाली पिदडी, दिनेश शर्मा, राजेश तिघे, ज्ञानेश्वर इंगळे, श्याम पेंडंके, संगीता पेंडंके आदींसह भत या अभियानात सहभागी झाले होते