दिवाळीपूर्वी दिल्लीची हवा ‘गुदमरणारी’

अक्यूआय अत्यंत वाईट श्रेणीत

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi AQI in bad category दिवाळी जवळ येत असतानाच देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा प्रदूषणाच्या दाट धुक्यात हरवली आहे. राजधानीतील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘खूप वाईट’ श्रेणीत पोहोचला असून, अनेक भागांमध्ये धुळीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी दिल्लीतील जहांगीरपुरी, आनंद विहार, द्वारका आणि बवाना भागात अक्यूआय 300 च्या वर नोंदवला गेला. या ठिकाणी हवेत प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की, दृश्यमानता कमी झाली असून, संपूर्ण शहर धुळीच्या चादरीत झाकले गेले आहे.
 

Delhi AQI in bad category 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी अक्षरधाम परिसरात अक्यूआय 230 तर बारापुल्ला फ्लायओव्हर आणि काही गात हवा गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत होती. शुक्रवारी सकाळी तर दिल्लीचाअक्यूआय ‘अत्यंत खराब’ श्रेणीत गेला होता. सकाळी ८ वाजता अक्यूआय ३६७ नोंदवला होता. आनंद विहार परिसरात सर्वाधिक ३७०, वजीरपूर ३२८, जहांगीरपुरी ३२४ आणि अक्षरधाम येथे ३६९ इतका अक्यूआय नोंदला गेला.
 
 
 
दरम्यान, दिल्लीतील इतर भागांमध्येही प्रदूषणाची स्थिती चिंताजनक आहे. बवाना, चांदणी चौक, द्वारका सेक्टर ८, नेहरू नगर, आयजीआय विमानतळ, रोहिणी, पुसा आणि इंडिया गेट परिसरात अक्यूआय 200 ते 300 च्या दरम्यान राहिला आहे. म्हणजेच दिल्लीचा बहुतांश भाग ‘खराब’ ते ‘अत्यंत खराब’ हवामानाच्या श्रेणीत गेला आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने दिल्ली-एनसीआरसाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (लागू केला आहे. अक्यूआय 211 पर्यंत घसरल्यानंतर या प्रदेशाला ‘खराब’ श्रेणी घोषित करण्यात आली आहे. यामुळे काही औद्योगिक क्रिया, बांधकामकामे आणि वाहनांच्या हालचालींवर निर्बंध लागू केले गेले आहेत. राजधानी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या सापळ्यात अडकली असून, दिवाळीच्या फटाक्यांपूर्वीच दिल्लीची हवा धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे.