मुस्लिम देशातही दिसले भारतीय सांस्कृतिक वैभव! video

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
दुबई,
Diwali in Muslim countries दुबई शहरात भारतीय सण दिवाळीचा उत्साह पाहून प्रत्येकाचे लक्ष वेधले आहे. मुस्लिम बहुल देश असूनही या शहरात रस्ते, इमारती आणि मॉल्स दिव्यांनी सजवले गेले असून भारतीय वैभवाचा अनुभव दिला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ दुबईच्या रस्त्यांवर दिवाळीचा प्रकाश आणि उत्सवाचे दृश्य टिपतो. संध्याकाळी शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये शहरातील गगनचुंबी इमारती, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रस्ते दिव्यांनी उजळलेले दिसतात. "हॅपी दिवाळी" आणि "लाइट्स फेस्टिव्हल" या फलकांमुळे वातावरण अधिक रंगीत आणि आनंददायी बनले आहे.
 
 
 
Diwali in Muslim countries
 
 
दुबईमध्ये लोकसंख्या मुस्लिम असूनही शहरातील उत्सव आणि सजावट भारतीय सांस्कृतिक वैभवाचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा अनुभव अत्यंत खास ठरतो. या दृष्यामुळे दर्शकांना असे वाटते की जणू काही ते भारतातील दिवाळीच्या रस्त्यांवर फिरत आहेत. रस्त्यांची रोषणाई, इमारतींचा तेज आणि शहरभर पसरणारा दिवाळीचा उत्साह पाहून प्रत्येक प्रवाशाचा आणि स्थानिकांचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.