गोजेगाव परिसरात तिहेरी अपघात

लातूर जिल्ह्यातील दोघे जागीच मृत

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
gojegaon-triple-accident : तालुक्यातील गोजेगाव परिसरात नांदेड-तुळजापूर महामार्गावर शनिवार, 18 ऑक्टोबरला दुपारी भीषण तिहेरी अपघात झाला. जेसीबीवर आयशर वाहन आदळले, आणि त्याच आयशरच्या मागून येणारी कार थेट मागून आत घुसली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारांनंतर जखमींना हदगाव उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये मनोज देगोरे आणि मंजूषा अहिंवार (दोघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी) यांचा समावेश आहे. तर प्रतिभा देगोरे, मनीषा राशीवार आणि पीयूष देगोरे हे गंभीर जखमी आहेत.
 

y18Oct-Apaghat 
 
माहितीनुसार, ही मंडळी लातूरचे रहिवासी असून चंद्रपूर येथे मुलगी पाहण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, रामराव देगोरे, निधी राशीवार आणि शिरूर आशीर्वाद हे किरकोळ जखमी झाल्याचे कळले. गोजेगाव परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने एका बाजूची वाहतूक बंद करून दुसèया बाजूने वनवे ट्रॅफिक सुरू होती. मात्र, त्या ठिकाणी आवश्यक सूचनाफलक न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
अपघातानंतर हदगाव उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष राजू तावडे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तसेच बालाजी ढोरे, शंकर जळके, गंगाधर काळे, भानेगावचे सरपंच सुदर्शन पाटील, गोविंद वाघमारे, मिलिंद पाईकराव आणि पिंटू काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
 
दरम्यान, अ‍ॅम्बुलन्स चालक विकास जाधव यांनी तत्काळ जखमी आणि मृतदेह रुग्णालयात दाखल केले. हदगाव पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.