तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Letuji Junghare : आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते, कोलाम समाजातील ‘ठाण्या वाघ’ म्हणून परिचित, समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि राजकारणात विरोधकसुद्धा आदराने नाव घेणारे लेतुजी जुनघरे यांचे शनिवार, 18 ऑक्टोबरला पहाटे निधन झाले.
बालपणापासून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या जुनघरे यांनी आयुष्यभर आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी कार्य केले. सरपंच ते सभापती अशा विविध संवैधानिक पदांवर राहून त्यांनी लोकसेवा बजावली.
अलीकडेच, 10 ऑक्टोबरला यवतमाळात झालेल्या आदिवासी आक्रोश भव्य मोर्चात त्यांचा सहभाग होता. समाजाच्या प्रश्नांवर शेवटच्या दिवसापर्यंत सक्रिय राहणाèया या नेत्याच्या जाण्याने आदिवासी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची जागा कोणीही भरू शकणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या राहत्या गावी सावरखेडा (ता. राळेगाव) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.