पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांना पहिला “कृतार्थ ज्येष्ठ” पुरस्कार

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Vilas Dangre ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांनी होमिओपॅथीक आणि समाजसेवक पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांना पहिला प्रतिष्ठित “कृतार्थ ज्येष्ठ” पुरस्कार प्रदान केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रभु देशपांडे व प्रमुख अतिथी डॉ. पंकज चांदे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून धर्म, समाज आणि राष्ट्र यासाठी जागृती करत असलेल्या डॉ. डांगरे यांनी “स्थितप्रज्ञ” जीवन मूल्यांचे आचरण करत कृतज्ञतेचा आदर्श सादर केला. तसेच, सामाजिक कार्यातील अग्रणी आणि कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनाही “कृतार्थ ज्येष्ठ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
Dr. Vilas Dangre
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अँड. अविनाश तेलंग यांनी केले. त्यानंतर गीत सौरभ संगीत ॲकेडमी तर्फे प्रा. उज्वला अंधारे यांनी “महाराणी कैकेयी” या एकपात्री कार्यक्रमाचे संगीतासह सादरीकरण केले, ज्यात उपस्थित ज्येष्ठांना कैकेयीची दुसरी बाजू समजली. या महिन्यात जन्मदिवस साजरे करणाऱ्या संभासदांना शाल व कुंडीरोपे देऊन सत्कार करण्यात आला. Dr. Vilas Dangre डॉ. डांगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कार्यकर्त्याचे पाय सदैव जमिनीवर राहावे, व्यक्तिमत्व विकास व मातृभूमीचे ऋण फेडणे हे प्राथमिक उद्दिष्ट असावे. डॉ. चांदे यांनी ज्येष्ठांनी भक्तिपथ पाळल्यास मन:शांती आणि समाधान मिळेल असे सांगितले. अध्यक्ष प्रा. प्रभु देशपांडे यांनी दीपावली आणि नूतनवर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
 
अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. अरविंद शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले व महानगर पालिकेच्या अधिकारी यांना समाज भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. Dr. Vilas Dangre राष्ट्रगीताच्या तालावर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती, आणि मोहन झरकर, विनोद व्यवहारे, अशोक बांदाणे, प्रकाश मिरकुटे, उल्हास शिंदे, राजभाऊ अंबारे, हेमंत शिंगोडे, वसंतराव बोकडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. वैशाली काळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी संचालन केले.
सौजन्य: अँड. अविनाश तेलंग, संपर्क मित्र