समुद्रपूर,
rss-samudrapur-branch : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समुद्रपूर शाखेचा विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येथील प्रतिष्ठीत नागरिक राममूर्ती पोनगंटी होते तर प्रमुख वता म्हणून जिल्हा सह संयोजक भारतीय विचार मंचचे धर्मेंद्र मुंदडा उपस्थित होते. व्यासपिठावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, तालुका संघचालक रवी गाठे, किशोर दीघे आदी उपस्थित होते.
संघाने आपल्या १०० वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा शताब्दी सोहळा साजरा केला. एक असा प्रवास ज्याने राष्ट्रभती, संस्कार, संघटनशती आणि समाजसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे, असे मत मान्यवरांनी व्यत केले. कार्यक्रमाला प्रा. मेघश्याम ढाकरे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, श्रीकांत महाबुधे, जिपचे माजी सदस्य फकिरा खडसे, बहादूरसिंग अकाली, विनोद कन्हाळकर आदी उपस्थित होते.