रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त १०० कार्यक्रम

-विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम होणार -चंद्रकुमार जाजोदीया यांचा संकल्प

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
अमरावती, 
chandrakumar-jajodia : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त १०० सामाजिक कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला असल्याचे प्रसिद्ध समाजसेवक, भाजपाचे कार्यकर्ते व अभाविपचे मार्गदर्शक चंद्रकुमार जाजोदीया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यातला पहिला कार्यक्रम रविवारी छत्री तलाव जवळ असलेल्या हनुमानगढी येथे दिपोत्सवाच्या स्वरूपात होणार आहे.
 
 
rss
 
 
 
सनातन धर्माला संपूर्ण जगात पोहोचविण्याचे व व्यक्ती निर्माणाचे कार्य करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षाचा प्रवास अदभूत आहे. त्यांच्या कार्याला साजेशे १०० कार्यक्रम पुढच्या वर्षभरात घेण्यात येतील. त्यात १० कार्यक्रम पारधी बेड्यांवर होतील, १० कार्यक्रम गरीब वस्त्यांमध्ये, वृक्षारोपनाचे १० कार्यक्रम, १० भागवत कथा, नेत्रदान, नेत्र प्रत्यारोपण, रक्तदान, १० देशभक्तीपर कार्यक्रम होतील. याशिवाय संघाची जुळलेल्या विविध संघटनांना हाताशी धरून संघाचा १०० वर्षाचा प्रवास विशद करणारी प्रदर्शनी लावली जाणार आहे. निंबध स्पर्धा, संत संमेलन, सनातन धर्मासाठी काम करणार्‍यांचा सत्कार, हिंदूराष्ट्र अभियान राबविण्यात येणार आहे. ब्रम्हाकुमारी सितादिदी, राजेश्वर माउली महाराज, कारंजेकर बाबा, शक्ती महाराज, सागर देशमुख महाराज, राजेशलाल मोरडीया या संत मंडळींसह भाजपा, प्रज्ञा प्रबोधनी, वनबंधू परिषद, अखिल भारतीय विद्याथी परिषद, विहिंप, बजरंग दल, आर्ट ऑफ लिव्हिंग, श्रीराम नवमी शोभायात्रा समिती, पतंजली परिवार, गुरूदेव सेवा मंडळ, शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान, हिंदू गौरक्षा दल यांच्याशिवाय अन्य संस्था सहभागी होणार असल्याचे चंद्रकुमार जाजोदीया यांनी सांगितले.
 
 
हनुमागढीवर उद्या दीपोत्सव
 
 
दिपावलीच्या शुभ पर्वावर हनुमान चालिसा चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने हनुमान गढी येथे रविवार १९ ऑक्टोबर रोजी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. येथे १११ फुट उंच हनुमानमर्ती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १४ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येच्या दीपोत्सव साजरा झाला होता. हा केवळ घरी परतण्याचा उत्सव नव्हता, तर तो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव होता. तीच परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रविवारी सांयकाळी ६ वाजता श्रीराम मंदिर अयोध्येतून आणलेली ज्योत ७ फुट दिवामध्ये लावून आरती होईल. सांयकाळी ७.३० वाजतापासून दीपोत्सव सुरू होईल. रात्री ९ वाजता भव्य आतषबाजी होईल. नागरीकांनी आपल्या परिवाराच्या सुखशांती, आरोग्यासाठी व उज्वल भविष्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने अखंड दीपज्योत लावाली असे आवाहन हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे.