स्वामी विवेकानंद चा संघ टेनिसमध्ये उपविजेता

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
गडचिरोली,
Swami Vivekananda College नागपूर विभागीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे बुधवारी करण्यात आले. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे. याच संघातील खेळाडू अनिश उके याची राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी झाली आहे.
 


fhb 
टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष आशुतोष कोरडे आणि सचिव चंद्रहास भुसारी यांनी अनिश व संघाला मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संस्थापक सतीश चिचघरे यांनी संघाचे कौतुक करत सांगितले की, ’खेळातील सातत्य आणि जिद्द हेच यशाचे रहस्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता अतकमवार यांनीही याच संघातील अनिश उके याची राज्यस्तरावरील संघात निवड झाली आहे. यापूर्वी कॅरम स्पर्धेत स्पदर्शन हजारे व निधी आलाम यांनी राज्यस्तर गाठले आहे.