समृद्धी महा मार्गांवरील अपघातात दोन विदेशी पर्यटक ठार

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
वाशीम,
accident on samruddhi वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात म्यानमार देशातील दोन पर्यटक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक २३२,/३०० डव्हा - जऊळका दरम्यान रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की, मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनाला जात असलेली इनोव्हा चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०१ बीबी १२१५ या वाहनाचे अचानक नियंत्रण सुटल्याने थेट वाहन रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली.
 
 
accident on samruddhi
 
अपघात एवढा भीषण होता की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे. या वाहनात ७ प्रवाशी होते. या भीषण अपघातात मिन ऑग (वय ३३), मिन चित ऑग (वय १३), रा. म्यानमार देश या दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी, तर चार जण किरकोळ झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे उपचार सुरु आहेत.