नागपूर,
Venkatesh Sanstha श्री. व्यंकटेश गृह निर्माण सहकारी संस्था मर्यादित, व्यंकटेश नगर, खामला रोड यांच्या वतीने "वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम" दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ (रविवार) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात निरंजन बोबडे प्रस्तुत गंध मराठी माती या मराठी गीतांचे सादरीकरण केले जाईल. या सांस्कृतिक कार्यक्रमात पोवाडा, लावणी, गोंधळ, भक्तिसंगीत तसेच सुगमसंगीताचा समावेश आहे. कार्यकारणी सदस्यांनी सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून मराठी संगीताचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य: विजय दाणी, संपर्क मित्र