वर्धा,
wardha-hydra-crane : मद्यधुंद अवस्थेत अवजड वाहन हायड्रा क्रेन चालविणार्या चालकावर मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली.
दिवाळी निमित्त बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होणार नाही याकरिता पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वाहतूक पोलिसांची ठिकठिकाणी नियुकती करण्यात आली आहे. आज १८ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्थानिक बजाज चौकात हायड्रा वाहन चालक निष्काळजीपणे वाहन चालवित असल्याचे सहाय्यक वाहतूक पोलिस उपनिरीक्षक मंगेश येळणे यांना दिसला. अवघ्या काही सेकंदातच या वाहनाने एका कारलाही धडक दिली. ही बाब लक्षात येताच अवजड वाहनाच्या चालकास थांबवून तपासणी करण्यात आली. याच तपासणीत चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पुढे आल्याने एम. एच. २७ ए. एस. २२२७ क्रमांकाचे अवजड वाहन पोलिसांनी जप्त केले. शिवाय वाहन चालक संदीप मंगरुळकर रा. बोरगाव मेघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंगेश येळणे, आशिष देशमुख, मुन्ना तिवारी यांनी केली.