वर्धा,
wardha-minor-girl-kidnapped : अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या अनोळखी युवक व पीडित मुलीस पोलिसांनी पुणे येथून अटक केली. या दोघांनाही हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले.
हिंगणघाट ठाण्यात अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार नोंद होती. पीडित मुलगी व आरोपीचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे देण्यात आला होता. तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तथा स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्फत सुरू असताना पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास करण्यात आला.
त्या अनुषंगाने आरोपीची व पीडित मुलीबाबत संपूर्ण माहिती संकलित करून राहुल कन्नाके (२१) रा. कुकाबर्डी ता. हिंगणघाट हा पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. शिताफीने सापळा रचून राहुल याला हडपसर पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याच्यासोबत राहत असल्याचे सांगितले. त्यावरून पीडित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.