वर्धा शिवसेनेची मुंबईत कार्यकारिणी जाहीर

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
Wardha Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. त्या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेने आपली तयारी सुरू केली आहे. नव्या जोमाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत जबाबदारी वाटून दिल्या आहेत. मुंबई बाळासाहेब भवन येथे शिवसेना सचिव संजय मोरे व भाऊसाहेब चौधरी तसेच पूर्व विदर्भातील प्रमुख नेते, विदर्भ समन्वयक आ. नरेंद्र भोंडेकर, विदर्भ संघटक किरण पांडव, वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख राज दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यात जिल्हाप्रमुख राजेश सराफ व प्रशांत शहागडकर यांनी शिफारस केलेल्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍याच्या नियुक्तीला सर्वानुमते संमती देण्यात आली.
 
 
shivsena
 
 
 
लोकसभा संपर्कप्रमुख राज दीक्षित, सहसंपर्क प्रमुख श्रीकांत मिरापूरकर, लोकसभा संघटक रविकांत बालपांडे, उप संघटक गणेश इखार, जिल्हा समन्वयक अनिल देवतारे, जिल्हाप्रमुख राजेश सराफ व प्रशांत शहागडकर महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी ठमेकर, युवासेना लोकसभा अध्यक्ष सूर्या हिरेखन, कामगार नेते प्रशांत रामटेके यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची आगामी निवडणूक संदर्भात बैठक पार पडली.
 
 
वर्धा विधानसभा उपजिल्हाप्रमुख मिलन गांधी, शहर प्रमुख शार्दुल वांदिले, तालुका प्रमुख प्रमोद पांडे, विधानसभा समन्वयक बादल श्रीवास. देवळी विधानसभा प्रमुख अजिंय तांबेकर, तालुका प्रमुख सुभाष कुर्‍हटकर, तालुका समन्वयक महेश जोशी, देवळी शहर प्रमुख सुरेश वैद्य, पुलगाव शहर प्रमुख गजानन नेवारे, शहर संघटक दिलीप पटले. आर्वी विधानसभा उपजिल्हाप्रमुख दशरथ जाधव, विधानसभा समन्वयक संदीप टिपले, आष्टी तालुकाप्रमुख चंद्रशेखर नेहारे, आर्वी तालुका प्रमुख स्वप्निल रणनवरे, कारंजा तालुकाप्रमुख सागर हिंगवे, कारंजा शहर प्रमुख सुजित चौधरी, आर्वी शहर प्रमुख धीरज लकडे, कारंजा उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) संदीप भिसे, कारंजा तालुका संघटक धनराज बैंगने, तळेगाव (शा.)शहर प्रमुख केवलसिंग जुने. हिंगणघाट विधानसभा उपजिल्हा प्रमुख अमित गावंडे, शहर प्रमुख दिनेश काटकर व शरद खुडसुंगे, शहर संघटक सोनू लांजेवार, तालुका संघटक स्वप्नील गाढवे, समुद्रपूर तालुका प्रमुख अविनाश जामुनकर, तालुका संघटक गिरीधर ठवरी आदी पदाधिकारी यांच्या नियुती करण्यात आल्या. संचालन प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांनी केले.