नागपूर,
Dhanteras shopping Nagpur सोने आणि चांदीचे दर दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत असताना धनत्रयोदशीनिमित्त नागपूर शहरातील सर्व बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी एकीकडे सोने चांदीची खरेदी तर दुसरीकडे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवीन घरांची बुकिंग अनेकांनी केल्या आहे. दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम आदी ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर यांची भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीसोबत पूजा केली जाते. सोन्या-चांदीशिवाय या दिवशी नव्या वस्तुंची खरेदी केल्या जाते. झाडणी, फडा खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते. इतवारीच्या स्टील, तांबे, पितळीच्या भांडे बाजारात दिवसभर विक्रमी गर्दी दिसून आली. ग्राहकांनी विशेषतः पितळेची देवी लक्ष्मीची मूर्ती, गणपतीची मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य दिले होते. सोने, चांदीचे दागिण्यांसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी क रण्याचा कल होता.
बाजारपेठेत मोठी उलाढाल
जीएसटीच्या दरात आणि दूकानदारांकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या ऑफर्समुळे ग्राहकांनी खरेदीचा भरपूर लाभ घेत आहे. जीएसटी सूट मिळाल्याने, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच क्षेत्रात चांगली विक्री होत आहे. आगामी काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होणार असल्याची माहिती चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी दिली.
ग्राहकांना आणि सुध्दा लाभ
जीएसटी हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लादला जाणारा अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटीने अनेक करांचा भार कमी केला आहे आणि त्यांना एकाच छताखाली आणले आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना आणि कंपन्यांना फायदा झाला असल्याची माहिती बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर मालवीय यांनी दिली आहे.अशासकीय क्षेत्रातील कंपण्यांकडून बोनस व अग्रीम रक्कम कर्मचार्यांना दिल्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी होती. यात प्रामुख्याने जीएसटीमुळे अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहे. लहान मोठया उद्योग क्षेत्राला जीएसटीमुळे दिलासा मिळाला असून यंदाच्या दिवाळीत अनेक बदल दिसून येत आहे. याशिवाय स्वदेशी वस्तूंना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याची माहिती कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी दिली आहे.
बाजारात ग्राहकांची दिवसभर वर्दळ
धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सोन-चांदीच्या दुकानांमध्ये ज्याप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती. अशीच स्थिती इतर दूकानात होती. धनत्रयोदशीच्या खरेदीच्या मुहूर्ताला दिवसभरात बाजारातील वर्दळ लक्षात घेता नागपूर शहरात कोट्यवधीची उलाढाल झाली. मुख्यत: धनत्रयोदशीच्या शुभ दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठया संख्येने विक्री झाली असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवर विशेष सवलती
इलेक्ट्रॉनिक्स डीलर्सने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी निमित्त टीव्ही, रेफ्रिजरेटर, साउंड सिस्टम आणि वॉशिंग मशीनवर विशेष सवलती दिल्या जात आहेत. तसेच फायनान्स कंपन्या ग्राहकांना आकर्षक ईएमआय देत आहेत. जीएसटीच्या दरात कपात आणि दूकानदारांकडून देण्यात विविध प्रकारच्या ऑफर्समुळे ग्राहक खरेदीचा लाभ घेत आहे.