तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Kojagiri festival कोजागिरी पौर्णिमा ही केवळ चांदण्यांची रात्र नाही तर आपुलकी, एकता आणि आनंदाचा उत्सव आहे. शरदाच्या शांत वाèयाने झुळझुळणाèया या चांदण्याच्या रात्रीत आनंदाचे, स्नेहाचे आणि ऐक्याचे चांदणे उतरावे यासाठी या शुभक्षणी आर्य वैश्य समाज यवतमाळतर्फे रविवार, 12 ऑक्टोबरला विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी कोजागिरी कार्यक्रम घेण्यात आला.
दीपप्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम नृत्य, विनोदी उखाणे, मॅचिंग ड्रेस स्पर्धा, हास्य आणि समाजातील गुणवंतांचा आर्य वैश्य समाज यवतमाळचे अध्यक्ष सतीश बनगिनवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृष्णाली अरुणा अमोल बोंकिनपिल्लेवारची ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’मध्ये लघु वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याबद्दल, तर आदिती आनंद काशेट्टीवारला स्काऊट गाईडमध्ये राष्ट्रपती पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्राप्ती चिंतावार व उज्ज्वल चिंतावार यांनी केले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष सतीश बनगिनवार, उपाध्यक्ष संजय कन्नावार, सचिव उज्ज्वल चिंतावार, कोषाध्यक्ष प्रमोद व्यवहारे, सहसचिव प्रवीण बंडेवार, कार्यकारिणी सदस्य हेमंत बेलगमवार, श्याम मॅडमवार, किशोर पुनवंतवार, अजय बनगिनवार, राम बिपल्लीवार, रवींद्र मानलवार, गजानन बट्टावार, कृष्णा येरावार, राहुल यमसनवार आणि आशिष पद्मावार यांनी परिश्रम घेतले. स्वादिष्ट भोजन आणि दुग्धप्राषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.