बुलढाणा,
Ayurved-AYUSH-Buldhana आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटिस्ट या उपेक्षित वैद्यकीय पॅथी क्षेत्राला आयुषच्या माध्यमातून चालना देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या तिन्ही वैद्यकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यासाठी बुलढाणा येथे २.१५ कोटी खर्चुन आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून भव्य-दिव्य आरोग्य भवन साकारले असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज धनत्रयोदशीच्या पर्वावर करण्यात आला. यावेळी आरोग्यविषयक उपक्रमांमुळे हॉस्पिटल हब असणार्या बुलढाणा शहरातील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम होतील, असा विश्वास आ. गायकवाड यांनी व्यक्त केला.

Ayurved-AYUSH-Buldhana दि. १८ ऑटोबर रोजी धनत्रयोदशीच्या पावन पर्वावर बुलढाणा शहरात आरोग्यसेवा क्षेत्रातील नवे पर्व सुरू झाले. निमा भवन, डेंटिस्ट भवन, होमिओपॅथी भवन या तीनही आरोग्यसेवेशी निगडित महत्त्वपूर्ण भवनांचे लोकार्पण आ. संजय गायकवाड यांच्याहस्ते उत्साहात पार पडले. धन्वंतरी पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यावर्षी प्रथमच धन्वंतरी पुरस्कार देऊन धनत्रयोदशीचे पर्वावर सन्मानित करण्यात आले. धन्वंतरी पुरस्कार प्राप्त मान्यवरामध्ये बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. प्रशांत पाटील, होमिओपॅथिक क्षेत्रातील ज्येष्ठ डॉ. दादासाहेब कवीश्वर आणि आर्युेवेदिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे डॉ. गजानन पडघान यांचा समावेश आहे. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणादायी योगदान अधोरेखित झाले. यावेळी पुरस्कारप्राप्त डॉटरांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Ayurved-AYUSH-Buldhana यावेळी मृत्युंजय संजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, पृथ्वीराज गायकवाड, अनुजाताई सावळे, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. दादासाहेब कवीश्वर, डॉ. राजेद्र वाघ, डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. गजानन पडघान, डॉ. सुभाष जोशी, डॉ. चंद्रकिरण पवार, डॉ. राजेश जतकर, डॉ. वैशाली पडघान, डॉ. विप्लव चव्हाण, डॉ. शरद जुमडे, डॉ. योगेश शेवाळे, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, उमेश कापुरे, सचिन गायकवाड, सागर घट्टे, डॉ. गायत्री सावजी, पत्रकार राजेंद्र काळे यांसह निमा भवन, डेंटिस्ट भवन व होमिओपॅथिक भवनचे सभासद, वैद्यकीय तज्ञ, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.