सावली,
Chandrapur-drown-death चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील बोथली (इंदिरानगर) येथील असोलामेंढा मुख्य कालव्यात आजोबा-नातू वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. पोलिस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान रविवार, 19 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील चकदुगाळा जवळील नहरात आजोबा भगवान लाटेलवार (70) यांचा तर फिस्कुटी जवळ नातू रोहीत गोरंतवार (14) याचा मृतदेह सापडला.चिमूर तालुक्यातील खांबाडा येथील रहिवासी असलेले भगवान लाटेलवार हे दिवाळीसाठी मुलीच्या गावी सावली तालुक्यातील बोथली (इंदिरा नगर) येथे भेटीस आले होते.

Chandrapur-drown-death दरम्यान, ते शनिवारी सकाळच्या सुमारास नातु रोहित राजू गोरंतवार (14) याच्यासह बोथली जवळून वाहणार्या आसोलामेंढाच्या मुख्य नहरात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने नातवासह आजोबा वाहून गेले. घटनेबाबत कळताच पोलिस विभागाच्या वतीने शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यानंतर रविवार सकाळपासून पुन्हा शोधमोहिम सुरू केली असता नातवाचा चकदुगाळा तर आजोबाचा फिस्कुटी जवळील नहरात मृतदेह सापडला. ही गावे मूल तालुक्याच्या हद्दीत येत असल्याने मूल पोलिस विभागाच्या वतीने दोघांचेही मृतदेह मूल उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.