'या' योजनेचा घ्या फायदा! खात्यात जमा होईल एवढी 'रक्कम'

"MIS योजना" गुंतवणूकदारांमध्ये ठरत आहे लोकप्रिय

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
post office MIS सध्याच्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदार असे पर्याय शोधत आहेत, जेथे भांडवल सुरक्षित राहील आणि त्यावर दरमहा निश्चित उत्पन्नही मिळेल. अशा वेळी केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम (MIS) या योजनेंकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतो आहे. ही योजना सरकारची असल्यामुळे सुरक्षिततेचा विश्वास असून, यामध्ये दरमहा हमखास व्याज मिळत असल्याने निवृत्त व्यक्तींपासून ते गृहिणींपर्यंत अनेक गुंतवणूकदारांमध्ये ती विशेष लोकप्रिय ठरत आहे.
 

post office MIS  
पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेमध्ये गुंतवणूकदाराला एकदाच ठराविक रक्कम गुंतवावी लागते. या गुंतवणुकीवर ठराविक दराने दरमहा व्याज मिळतं, जे थेट खातेदाराच्या बँक खात्यात जमा केलं जातं. सध्या या योजनेवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज दिलं जात आहे. ही योजना एकल खात्यासाठी ₹९ लाखांपर्यंत आणि संयुक्त खात्यासाठी ₹१५ लाखांपर्यंत गुंतवणुकीची परवानगी देते.संयुक्त खाते उघडल्यास (जसे की पती-पत्नीने मिळून), आणि ₹१० लाखांची गुंतवणूक केल्यास दरमहा सुमारे ₹६,१६७ इतकं व्याज खात्यावर जमा होतं. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर, म्हणजे ₹१५ लाखांवर, दरमहा ₹९,२५० पर्यंत निश्चित परतावा मिळू शकतो. या योजनेची कालावधी पाच वर्षांची असते. मुदत पूर्ण झाल्यावर गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळालेलं व्याज परत दिलं जातं.
 
 
ही योजना post office MIS सुरू करण्यासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स अकाउंट असणं बंधनकारक आहे. खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करता येते. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून सरकारच्या अखत्यारित असल्याने भांडवलाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका राहात नाही.जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे आणि शेअर बाजारातील चढ-उतारामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि निवृत्त व्यक्तींना हमखास उत्पन्न देणाऱ्या योजनांची गरज भासत आहे. त्यामुळेच MIS सारख्या योजनांकडे मोठ्या प्रमाणात ओढा वाढला आहे. वाढती महागाई, वैद्यकीय खर्च, आणि वृद्धापकाळात आर्थिक आधार आवश्यक असणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही योजना केवळ सुरक्षितच नाही, तर दीर्घकालीन दृष्टिकोनातूनही फायदेशीर ठरत आहे.
 
 
आर्थिक शिस्त, post office MIS हमखास परतावा, आणि भांडवलाची शंभर टक्के सुरक्षितता या तीन घटकांमुळे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही सध्या एक विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे येत आहे. ज्यांना जोखीम टाळून नियमित उत्पन्नाची गरज आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना निश्चितच एक उत्तम संधी ठरू शकते.