मतदार याद्या विभाजित करणे सुरू

बीएलओ, पर्यवेक्षकांना प्रशिक्षण

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur municipal election voter list division महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजित करण्याचे कामकाज शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी नियुक्त प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या कामकाजासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.

Nagpur municipal election voter list division
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, महापालिकेचे सहायक आयुक्त तथा सहायक प्राधिकृत अधिकारी श्याम कापसे, महापालिकेचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंते, निवडणूक कामासाठी नियुक्त पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि प्रगणक उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय मतदार यादी विभाजन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघाची 1 जुलै 2025 ची अंतिम मतदार यादी गृहीत धरण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार मतदार याद्या महापालिकेला प्राप्त झाल्या असून प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन केले जाणार आहे. यासाठी नेमलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी समन्वयाने काम करावे. हे काम महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार विहित वेळेत कामकाज पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी-कर्मचाèयांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.


कामकाज पूर्ण होईपर्यंत रजा रद्द
मतदार याद्या विभाजन कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाèयांना या कालावधीत रजा दिली जाणार नसून कर्तव्यात कसूर करणाèयांविरुद्ध नियमाधिन कारवाई करण्यात येईल. निवडणूक कामकाजासाठी प्रभागनिहाय नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच प्रत्यक्ष स्थळ भेटीसाठी येणाèया प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक व योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहनही मनपाने केले आहे.


प्रभागनिहाय याद्या होणार
मतदार यादी विभाजित करण्यासंदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रगणकांची भूमिका, बीएलओ आणि पर्यवेक्षकांची जबाबदारी काय हे समजावून सांगण्यात आले. क्षेत्रीय अधिकाèयांच्या अधिपत्याखाली हे कामकाज काटेकोरपणे पार पाडण्याबाबत सूचना दिल्या. प्रभागाच्या सीमारेषेनुसार मतदार यादी विभाजित करण्याची प्रक्रिया विहित वेळेत करावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून सर्व 38 प्रभागांची प्रभागनिहाय मतदार यादी तयार करायची आहे.