नागपूर,
Dhanvantari Yagna अश्विन वद्य त्रयाेदशी अर्थातच दीपावलीचा महत्वाचा सण म्हणजेच धनत्रयाेदशी. यंदाही आराेग्याची देवता भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘धन्वंतरी यज्ञ साेहळा वेदमूर्ती नचिकेत काळे गुरुजी यांचे पाैराेहित्याखाली नागपुरातील आराेग्य क्षेत्रातील विविध तज्ञ डाॅक्टरांच्या उपस्थितीत बजाजनगर येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात संपन्न झाला.
यावेळी श्री धन्वंतरीचे पुण्यवाचन, मंत्रांनी अभिषेक, पुराेहितांच्या आवाहनाने हाेम हवन, मंत्र जप, पूर्णाहुती आणि आरती असा परिपाठ करून प्रसाद वितरणानी कार्यक्रमाची सांगता झाली. सुप्रसिद्ध वैद्य डाॅ. अजय कडूस्कर, हाेमिओ तज्ञ डाॅ. रमाकांत कापरे, आयुर्वेद तज्ञ डाॅ. अभिजित मुंशी, डाॅ. श्रीरंग वराडपांडे, डाॅ. याेगेश बाेंडे, शल्य चिकित्सक डाॅ. प्रणाम सदावर्ते, डाॅ. अजय सारंगपुरे, डाॅ. क्षीरसागर, डाॅ. माधुरी पाटील, अभिजित कथले आदी वैद्य मंडळींनी यज्ञात सहभाग घेतला. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दयाशंकर तिवारी, पद्मश्री डाॅ. विलास डांगरे यांनी शुभेच्छा दिल्या. आयाेजनाच्या यशस्वितेसाठी अजिंक्य व्यवहारे, अविनाश संगवई, नरेंद्र कुलकर्णी, केतकी काळे, समृद्धी वराडपांडे आदींनी परिश्रम घेतले