रेल्वेखाली येवून सात गोमाता ठार, सहा जखमी

जीवरक्षक संस्थेने जखमी गो मातेचे वाचविले प्राण

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट, 
seven-cows-killed-hinganghat अवघे गाव शुक्रवार दि. 17 सप्टेंबरला वसुबारसच्या निमित्ताने गाय व तिच्या वासराचे पूजन करून आपल्या कुटुंबासाठी तिचे आशीर्वाद होते तर दुसरीकडे सात गो मातेचे रेल्वे अपघातात निधन झाले. याची ना माहिती कोणाला होती आणि माहिती देऊनही ना प्रशासनाने या मुक्या जीवाची दखल घेतली.
 
 
seven-cows-killed-hinganghat
 
मुकी बिचारी पूजनीय सात गो मातानी तडफडत आपले प्राण सोडले
हिंगणघाट पासून केवळ अर्धा की. मी. अंतरावरील नागपूर काजीपेठ या रेल्वे मार्गावर दुपारच्या वेळेला एका भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात रेल्वे गाडीखाली येवून सात गो माता चिरडून ठार झाल्या. seven-cows-killed-hinganghat जवळपास 13 गायी ह्या रेल्वे रुळावर आपले खाद्य शोधत असतांना हिंगणघाट वरून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेने या गायीना दिलेल्या धडकेत सात गायी घटनास्थळी ठार झाल्या. तर अन्य पाच गायी जखमी झाल्या. त्यापैकी दोन गंभीर गाईना उपचारासाठी अमरावतीच्या गोकुलम गौरक्षण येथे पाठविण्यात आल्या आहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच जिवरक्षक राकेश झाडे हें रात्रीच्या वेळी आपल्या चमुला घेऊन घटनास्थळी गेले. त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले परंतु रेल्वे पोलिसां कडून कोणीही मदतीला आले नाहीत. seven-cows-killed-hinganghat या अपघातग्रस्त मार्गावरून दोन्ही बाजूने रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु होती. त्यामुळे या जखमी व मृत गाईना बाजूला काढण्यासाठी काही वेळा साठी रेल्वे वाहतूक बंद ठेवणे आवश्यक होते. परंतु रेल्वे प्रशासनाला विनंती करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर आपल्या जीवावर उदार होतं रात्रीच्या अंधारात जीवरक्षक फाउंडेशनचे सदस्य यांनी तीन रेल्वे रुळ ओलांडत या सात जखमी गाईना उचलून बाजूला काढले. त्या पैकी दोन जास्त गंभीर असलेल्या गाईना होयड्राच्या सहाय्याने उचलून एका खासगी गाडीत ठेऊन अमरावतीच्या गोकुलंम गौरक्षण संस्था येथे ऊपचारासाठी गावातील दानदात्याच्या मदतीने पाठविले. या पैकी किरकोळ जखमी गायी यांच्यावर उपचार करण्यासाठी जीवरक्षक संस्थेत दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर इतर क्रियाकर्म वं कायदेशीर सोपस्कार करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे ती यंत्रणा स्वस्थ बसून होती मात्र जिवरक्षक संस्थेने नेहमीच्या सवयीने पुढाकार घेत आपले मानवतेचे कार्य पार पाडले. या बचाव व राहत कार्यात राकेश झाडे यांना सर्वश्री दिनेश वर्मा, गोलू मडावी, भाविक कोपरकर, ओम कापसे, साहिल माहुरे, ॐ मेसरे, व अन्य जनतेनी रात्रीच्या अंधाराची तमा न बाळगता या जखमी गाईना वाचविण्या साठी अथक परिश्रम घेतले. मुक्या जीवाच्या वेदनेला आपली वेदना समजून त्यांना नवजीवन देण्याचे व्रत घेतलेल्या या जिवरक्षक फाउंडेशनच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
सतीश वखरे