श्री गुरू मंदिरात गुरुद्वादशी सोहळा उत्साहात

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
नागपूर
Shri Guru Mandir Nagpur, जयप्रकाशनगरातील श्री गुरू मंदिरात श्री गुरूद्वादशी व श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या निजानंदगमन दिनानिमित्त श्रींचा पालखी प्रदक्षिणा सोहळा अतिशय उत्साहात व भावपूर्ण वातावरणात शनिवारी झाला. नागपुरातील विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या जयघोषात कल्पवृक्ष औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या. सूर्यास्तानंतर श्री गुरू मंदिराच्या प्रथेप्रमाणे, उपासनेच्या पाचही प्रदक्षिणा धर्मभास्कर सद््गुरुदास महाराजांच्या पावन उपस्थितीत म्हणत दत्तात्रेयांचा पालखी सोहळा झाला. यावेळी इथे जणू गाणगापूरच अवतरल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. दिव्यांच्या रोषणाईत व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी सोहळा पार पडला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. भाविक भक्त फार मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
 

Shri Guru Mandir Nagpur,