मणक्याचे आरोग्य शरीराच्या आरोग्याचा पाया

मणक्याची घ्या काळजी,जागतिक स्पाईन दिन

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
नागपूर,
World Spine Day 2025 आजच्या काळात पाठदुखी व मानदुखी सर्वसामान्य आरोग्य समस्या बनल्या आहेत. बसून काम करणारी जीवनशैली, जास्त कामाचे तास, चुकीची बसण्याची पद्धत व शारीरिक क्रियाशीलतेचा अभाव या सर्वांचा परिणाम म्हणून पाठीच्या मणक्याशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे.
 

World Spine Day 2025  
जगभरात 16 ऑक्टोबर हा स्पाईन दिवस पाळला जातो, तो मणक्यांच्या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठीच. अनेक लोक सतत पाठदुखी, पायांमध्ये मुंग्या, कडकपणा किंवा हालचाल करण्यात अडचण यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. तात्पुरता त्रास मानतात. मात्र, ही लक्षणे पाठीच्या मणक्याशी संबंधित गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात, ज्यांच्यावर वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. मोहम्मद फैजान यांनी व्यक्त केले.
पाठीच्या मणक्याची काळजी म्हणजे फक्त उपचार नव्हेत. प्रतिबंध व जागरूकताही तितकीच महत्त्वाची आहे. योग्य पोस्चर ठेवणे, जास्त वेळ बसून न राहणे, नियमित स्ट्रेचिंग व सक्रिय जीवनशैली, या सोप्या उपाययोजनांनी पाठीच्या मणक्याशी संबंधित अनेक समस्या टाळता येऊ शकतात. वेदना, अस्वस्थता सतत राहिल्यास तज्ज्ञांचा वेळेत सल्ला घेणे परिस्थिती गंभीर होण्यापासून व जीवनमानावर परिणाम होण्यापासून वाचवू शकते.
 
 
वैद्यकीय विज्ञानातील World Spine Day 2025  प्रगतीमुळे पाठीच्या मणक्याशी संबंधित आजारांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. इन्ट्राऑपरेटिव्ह नेव्हिगेशन सिस्टम्स, हाय-रिझोल्यूशन इमेजिंग, न्युरोमॉनिटरिंग व स्पाईन सर्जरीसाठी खास डिझाईन केलेल्या ऑपरेटिंग सूट्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्जरी अधिक सुरक्षित व अचूक झाली आहे.
आजच्या रुग्णांना मिनिमली इनवेसिव्ह व एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीसारख्या आधुनिक तंत्रांमुळे फायदे होतो. या पद्धतींमुळे छोट्या छिद्रांद्वारे जटिल परिस्थिती हाताळता येते, ज्यामुळे दुखणे कमी होते, रक्तस्राव कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो. पाठीच्या मणक्याचे आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा पाया आहे. योग्य पोस्चरकडे लक्ष देऊन, सक्रिय राहून आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन, अनेक मणक्याशी संबंधित आजार टाळू शकतो.