नागपूर,
Swarvedh Diwali Pahat ‘स्वरवेध’च्या वतीने वेगळ्या संकल्पनांवर आधारित दीपाेत्सव 2025 अंतर्गत पाच भव्य दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. साेमवार 20 अॅाक्टाेबर पासून शुक्रवार 24 अॅाक्टाेबर पर्यंत दरराेज सकाळी 6 वा लक्ष्मीनगर येथील सायंटििफक साेसायटी सभागृहात सदर सांगीतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.
यामध्ये 20 अॅाक्टाेबर -भाव डाेळ्यांचे, 21 ला - भाव मनाचे, 22 ला - भाव निसर्गाचे, 23 ला भावरसिकांचे अशा वैविध्यपूर्ण गाण्यांतून रसिकांना अनाेखी सांगीतिक मेजवानी मिळणार आहे. 24 अॅाक्टाेबरला रसिकांच्या खास आग्रहास्तव अभिजात नाट्यसंगीताच्या मेजवानीने पाच सांगतिक दीपाेत्सवाची सांगता हाेणार आहे. रसिकांच्या आवडीची गाणीही यात सादर हाेणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना अॅड. भानुदास कुलकर्णी यांची आहे. प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जाेशी, निरंजन बाेबडे, डाॅ. मंजिरी वैद्य-अय्यर, डाॅ. शीला कुलकर्णी, यश खेर,आदित्य सावरकर, पारिजात काळीकर, साक्षी सराेदे, लक्ष्यती काजळकर-भुसारी,श्रृती बाईवार-गाडे, राधा ठेंगडी यांच्या सुरेल गायकीने रसिकांची दिवाळी सुरेल हाेणार आहे. या निःशुल्क असून कार्यक्रमांना रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वरवेधचे कार्याध्यक्ष अॅड. आनंद परचुरे यांनी केले आहे.