तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Vivekananda Center कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राचा युवा नेतृत्व विकसन उपक्रम यवतमाळ शाखेतर्फे पार पडला. बाबाजी दाते महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रविवार, 12 ऑक्टोबर रोजी दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात शहरातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यात बाबाजी दाते महाविद्यालय, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, शासकीय बीएड महाविद्यालय, विद्याभवन, वाधवानी कला महाविद्यालय आणि वाधवानी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात 55 विद्यार्थिनी आणि 5 विद्यार्थी असे एकूण 60 शिबिरार्थी होते. त्यात विवेकानंद केंद्राच्या विभागातील 21 आणि प्रांतातील 4 अशी 25 कार्यकर्त्यांचेही त्यात योगदान होते.शिबिराची सुरवात पंकज वसानी यांनी तीन ओंकार व शांतीमंत्राने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस भावे व आशिष कुळकर्णी यांनी केले. स्फूर्तीगीत पल्लवी गाडगीळ यांनी प्रस्तुत केले. शिबिराच्या प्रथम सत्रात बाबाजी दाते महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा. सचिन तेलखेडे यांनी ‘कम्युनिकेशन स्किल्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी हाऊ टू रिड, हाऊ टू राईट, हाऊ टू लिसन या विषयांवर मार्गदर्शन केले.
कृतीगीत पल्लवी गाडगीळ Vivekananda Center यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे शिकवले. प्रथम सत्रानंतर शारीरिक व्यायामांतर्गत विविध क्रियांमध्ये विद्यार्थ्यांकडून स्ट्रेचिंग, वॉर्मअप, तसेच सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. यात पंकज वसाणी, उदय सज्जनवार व संतोष कचरे यांनी शिकवल्यानंतर प्रात्यक्षिक करवून घेतले. त्यानंतर विविध मैदानी खेळ खेळण्यात आले. त्यामध्ये केंद्र चलो, वाघ बकरी, अंगद का पैर, इत्यादी कसरतींचे व नैतिक खेळ खेळण्यात आले. त्यानंतरच्या ‘मंथन’ या चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली. त्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयांतर्गत विद्यार्थ्यांकडून चर्चा घडविण्यात आली.
अरुणा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमोल गाढवकर यांनी शिबिराचे समारोपीय उद्बोधन केले. यावेळी डिसेंबरमध्ये होणाèया विवेकानंद केंद्राच्या तीन दिवसीय निवासी शिबिरामध्ये युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.विश्वकल्याण श्लोक व केंद्र प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिल्याबद्दल केंद्रप्रमुख व संयोजक सुरेंद्र नार्लावार यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.