वसूबारस निमित्त युवकांनी केले नंदी पूजन
wardha-diwali चौक आणि परिसर केला चकाचक
दिनांक :19-Oct-2025
Total Views |
सिंदीरेल्वे,
Wardha-Diwali वसू बारसच्या निमित्ताने युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील नंदीच्या परिसरात चौकासह साफसफाई करुन शहराचे आराध्य दैवत नंदीचे पूजन केले. दरवर्षी, तान्हा पोळा आणि दिवाळ सणाच्या वसूबारशीच्या दिवशी येथील गांधी चौकातील नंदीच्या मुर्तीचे पूजन केल्या जाते. त्या अनुषंगाने युवकांनी चौकात स्वच्छता मोहीम राबवली. नंदी महाराजांना अभ्यंग स्नान घालण्यात आले. धूप दीप देऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. wardha-diwali भगवान शंकराचे वाहन असल्याने शंकराची आरती करण्यात आली. याच प्रमाणे शहरातील इतरही मंदिरात स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प समितीचे सदस्य यश बोरकर आणि शिवम तडस यांनी जाहीर केला.