देवळी,
Wardha-NCC आज सैनिकी मानसिकता असलेल्या तरुण-तरुणींची देशाला नितांत गरज आहे. ज्यातून युवा पिढीत शिस्त, साहस, समर्पण, देशभती व नैतिक मूल्य निर्वाण होते. या दृष्टिकोनातून एनसीसीचे प्रशिक्षण महत्त्वाचे असून एनसीसीतून सैनिकी व्यतिमत्त्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल जीसांतो यांनी केले.Wardha-NCC स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील एनसीसी युनिटला दिलेल्या सदिच्छा भेट प्रसंगी छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना १८ रोजी ते बोलत होते. व्यासपीठावर एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
Wardha-NCC लेफ्टनंट कर्नल जीसांतो यांनी अडथळा पार प्रशिक्षण केंद्र, सैन्यदलात सामील होण्याकरिता पूर्व तयारी प्रशिक्षण केंद्र, सैनिकी प्रशिक्षणाकरिता डमी रायफल, प्रशिक्षणाचे साहित्य, एनसीसी हॉल, एनसीसी अधिकारी ऑफिस व कॅडेट रूम इत्यादीचे निरीक्षण केले व उत्तम प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रशंसा केली. प्रास्ताविक एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी करून प्रशिक्षणाकरिता आवश्यक अद्यावत सुविधा उपलब्ध असल्याबाबत सांगितले. Wardha-NCC अंडर ऑफिसर रितेश बुटे याच्या नेतृत्वात छात्र सैनिकांनी ’गार्ड ऑफ ऑनर’ देऊन कर्नल जीसांतो यांचे सैनिकी पद्धतीने स्वागत केले तर अंडर ऑफिसर मयुरी पेटकर हिच्या नेतृत्वात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या छात्र सैनिकांनी मानवंदना दिली. संचालन कॅडेट्स सार्जंट मेजर कल्याणी लिखार हिने तर सार्जंट वैष्णवी कन्नाके हिने आभार मानले. यशस्वीतेकरिता अंडर ऑफिसर कोमल शितळे, सार्जंट निशांत शितळे, समीक्षा नेवारे, सत्तेश्वरी सावरकर व छात्र सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.