अग्रलेख...
sangh shatakpurti कोणत्याही लाभाविना, कोणत्याही लोभाविना आणि कुणाविषयीही राग-लोभ न पाळता केवळ राष्ट्रसेवेचे व्रत संपूर्ण समर्पणासह पाळत आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी पर्व आज, विजयादशमीच्या पावन दिनापासून सुरू होत आहे. गेल्या शतकभरात संघाचे देश किंवा देशवासीयांसाठी योगदान काय, याचा ताळेबंद मांडला तर असे दिसते की, संघाचे देश व देशवासीयांसाठी फार मोठे योगदान आहे. संघाने भारतासाठी दिलेले सर्वांत महत्त्वाचे योगदान कोणते असेल तर ते आहे आत्मभानाचे! संघाच्या शतकभराच्या वाटचालीचा आढावा घेताना असे ठामपणे म्हटले जाऊ शकते की, आत्मविस्मृती झालेल्या हिंदू समाजाच्या संघटनासाठी आणि बलशाली राष्ट्र घडवण्यासाठी शतकभरापूर्वी संघाची स्थापना झाली होती आणि त्या स्थापनेचा हेतू आता प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे, हे संघकार्याचे यश. शतकभरात सातत्याने प्रयत्न करून आत्मविस्मृतीचा बळी ठरलेल्या समाजाचे आत्मभान संघाने जागे केले आणि आपण भारतीय असल्याबद्दलचा गौरव प्रत्येकाच्या मनात निर्माण केला. आत्मग्लानीच्या विळख्यात असलेल्या समाजाला आत्मगौरव प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक अधिष्ठानाच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा नव्याने परिचय घडला तो संघामुळे. स्वातंत्र्यापूर्वी दीर्घ काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातही भारतीय संस्कृती ते भारतात तयार झालेल्या वस्तू अशा सर्व गोष्टींबद्दल अनेकांच्या मनात बऱ्यापैकी नकारात्मक भावनाच होती. ती संपवण्यासाठी आणि आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाप्रति अभिमान बाळगणाऱ्या अनेक पिढ्या घडवण्यासाठी संघाने केलेले कार्य अतुल्य, अदम्य आणि असीम स्वरूपाचे आहे. साऱ्या जगात संघाच्या या कार्याला तोड नाही.
अमेरिकेतील शिकागो येथे 1893 मध्ये झालेल्या जागतिक धर्मसंसदेत स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, माझ्या धर्माने सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचे पाठ जगाला शिकविले. त्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. सर्व धर्म हे सत्याचा मार्ग दाखविणारे आहेत, असे आम्ही मानतो. छळ सोसलेल्या सर्व धर्मांतील तसेच देशातील लोकांना जेथे आश्रय मिळत आला आहे, अशा देशाचा प्रतिनिधी असल्याचा मला अभिमान आहे. विविध ठिकाणांपासून सुरू होणाऱ्या नद्या वेगवेगळ्या मार्गांनी मार्गक्रमण करीत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे माणसं आपापल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतात, परंतु ते सर्व मार्ग ईश्वराप्रत जातात, यावर आमचा विश्वास आहे. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म परंपरेची शाश्वत मूल्ये सांगताना केलेल्या या प्रतिपादनातून असे दिसते की, या परंपरेने कधीही विशिष्ट उपासना पद्धतीचा आग्रह धरला नाही. तेच तत्त्व संघानेही अंगीकारले. भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वानुसार साऱ्यांना आपले मानले आणि समाजासाठी वाहून घेतले. संघाच्या रचनेत, विचारसरणीत औदार्य आरंभापासून आहे. जात-धर्म-पंथाच्या पल्याड जाऊन एकोपा साधणे हा संघाचा स्वभाव आहे. भारतमातेच्या सर्व अपत्यांचे वैभवशाली राष्ट्र निर्माण करायचे तर भेदाभेदांना स्थान असता कामा नये, हीच संघाची आरंभापासूनची भूमिका राहिली आहे. आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार म्हणायचे की, हिंदू संस्कृती हा हिंदुस्थानचा प्राणवायू आहे. हिंदुस्थानचे संरक्षण करायचे असेल तर हिंदू संस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे. या संस्कृतीचा पराभव आपल्याच भूमीत झाला तर हिंदुस्थान नावाचा केवळ भूगोल शिल्लक राहील आणि त्याला कोणताही अर्थ नसेल. राष्ट्र म्हणजे केवळ भूगोल असत नाही. ती माणसांच्या शांततामय सहअस्तित्वासाठी सांस्कृतिक-धार्मिक-आध्यात्मिक धाग्यांची वीण असते आणि त्यातून सशक्त समाज घडतो. संघाने हा विचार निगुतीने अंमलात आणला. हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर संघावर भरपूर टीका-टिप्पणी झाली. प्रामुख्याने ती गैरसमजातून झाली. अशा स्थितीतही हिंदू म्हणजे या भूमीवरील प्रत्येक व्यक्ती, असा सर्वसमावेशकतेचा भाव संघाने मांडला. हजारो वर्षे भारतभूमीवर राहणाऱ्या समाजातील समरसता, समंजसपणा, सौहार्द, सहिष्णुता या साèया तत्त्वांची परंपरा संघाने पुढे नेली. हे सारे करीत असताना नवतेचाही अंगीकार केला.sangh shatakpurti नव्या ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्वागत केले. आणि त्याच वेळी भारतीय ज्ञान परंपरेशी आधुनिक ज्ञानशाखांची सांगड कशी घालता येईल, यासाठीही प्रयत्न केला.
लोकांना भौतिक सुखे मिळायला लागली म्हणजे सारा समाज सुखी होत नसतो. भौतिकाचा अतिरेक नीतिमत्तेच्या मुळाशी उठत असल्याचे पाश्चात्त्य देशांमधील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. तिकडे भौतिक सुखाची कोणतीही कमतरता नाही. पण, दाम्पत्य सुख, कौटुंबिक सुख, पारिवारिक संस्कारांतून पुढच्या पिढ्या घडवण्याचा आनंद, धर्म-अध्यात्माच्या परंपरेशी असलेल्या नात्यातून मिळणारे सुख यातले काहीही नाही. आज तिकडे विभक्त कुटुंबांचे, कुमारी मातांचे, अनाथ मुलांचे प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत. समाजाला सांस्कृतिक परंपरांचे अधिष्ठान नसते तेव्हा असे घडत असते. प. पू. डॉक्टरांनी हिंदू संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा जागर शतकभरापूर्वी केला होता त्यामागे समाजाला असे अधिष्ठान पुन्हा मिळवून देण्याची दृष्टी होती. साèया समाजाला ऐक्याच्या सूत्रात गोवायचे असेल तर अशातले काही तरी तत्त्व लागत असते. प. पू. डॉक्टरांनी ते शोधून काढले आणि त्यानंतरच्या सर्व सरसंघचालकांनी तसेच संघ व संघ परिवारातील समस्त संघटनांनी या तत्त्वाचा विस्तार केला. प. पू. डॉक्टरांनी सैरभैर झालेल्या समाजासाठी त्या काळी ‘डॉक्टर’ म्हणूनच कार्य केले. प. पू. डॉक्टर स्वत: उच्चशिक्षित होते. त्यांच्यानंतर सरसंघचालकपदाची जबाबदारी ज्यांनी-ज्यांनी पार पाडली किंवा जे आज ती पार पाडत आहेत, ते देखील उच्चशिक्षित होते व आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली समाजात झिरपत असलेले अनिष्ट त्यांना कळते. त्यांचा परिणाम होऊन समाजाचा èहास होऊ नये, यासाठी संघाची धडपड सुरू आहे. शतकभरापूर्वी हा समाज एका सूत्रात बांधण्याचे व्रत सुरू केले गेले. संघाला जिंकायचे नाही, जोडायचे आहे, याच भावनेने काम केले गेले.sangh shatakpurti भविष्यात हा समाज नव्या काळातील गुंतागुंतीच्या प्रश्नांमधून व्यवस्थित वाटचाल कसा करेल, एकसंध राहून विकसित राष्ट्राचे स्वप्न कसे साकार होईल, यासाठी संघाचे कार्य सुरू आहे. भारताने विश्वगुरू व्हावे आणि साèया विश्वात भारताचा तसेच हिंदुत्वाचा गौरव वाढावा, यासाठी संघ कार्यरत आहे व राहणार आहे. भविष्यात याची प्रचीती येईलच. भारताच्या प्राणतत्त्वाची राखणदारी संघाने यासाठीच केली. स्वामी विवेकानंदांनी एकविसावे शतक हे भारताचे असेल, अशी भविष्यवाणी केली होती. ती सत्यात उतरताना दिसत आहेत. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताची गणना होऊ लागली आहे. भारताची सॉफ्ट पॉवर अर्थात आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा याच गोष्टी जगाला शांतता व प्रबोधनाकडे घेऊन जातील, असा आत्मविश्वास विवेकानंदांनी व्यक्त केला होता. त्याचीही प्रचीती येऊ लागली आहे. एकविसावे शतक हे भारताच्या बौद्धिक, मानसिक, सामरिक, राजकीय, तांत्रिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञानात्मक अशा सर्व क्षमतांचा पुनर्शोध घेणारे, त्या क्षमता वर्धिष्णू करणारे आणि त्याला सांस्कृतिक-आध्यात्मिक अधिष्ठान देणारे असेल. संघाच्या शताब्दीच्या पर्वावर पंचसूत्रीचा विचार यातूनच पुढे आला आहे. समरसता, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि नागरी कर्तव्ये अशी पाच अत्यंत महत्त्वाची सूत्रे घेऊन संघ यापुढील वाटचाल करणार आहे. यातील अन्य सूत्रांवर अंमल करतानाच, समाजातील भेदाभेद संपविण्यासाठी संघ अधिक प्रयत्न करणार आहे.sangh shatakpurti समाजात दुही माजविणारी तत्त्वे भेदाभेदांवरच खेळत असतात. त्यांना शह मिळेल हे नक्की. पंचसूत्रीच्या आधारे स्वयंसेवकांना साऱ्या समाजाला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे, एकोपा साधायचा आहे आणि विश्वभर आपला विचार, आपली संस्कृती पोहोचवायची आहे. भारत नावाच्या राष्ट्रपुरुषाची आराधना करीत आणि विश्वकल्याणाच्या भावनेशी बांधिलकी पाळत संघाने एक शतक पूर्ण केले. हे राष्ट्र परम वैभवाप्रति नेणे हे संघाचे ध्येय आहे आणि त्याकरिता ‘संघ शक्ति युगे युगे’ हाच सर्वोत्तम मंत्र आहे.